#Natepute:आई-वडिलांची सेवा हीच परमेश्वराची सेवा - ह भ प गणेश महाराज भगत
कै. लक्ष्मणतात्या भांड यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त कीर्तन सेवा
महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते येथील घनश्याम लक्ष्मण भांड,ॲड.धनंजय लक्ष्मण भांड, यांचे वडील कै. लक्ष्मणतात्या नागनाथ भांड यांचे प्रथम पुण्यस्मरण दि. १३ नोव्हेंबर रोजी संपन्न झाले. या निमित्ताने ह.भ.प. गणेश महाराज भगत यांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली होती.
सारासार विचार करा उठाउठी। नाम धरा कंठी विठोबाचे,
हा अभंग त्यांनी कीर्तन सेवेसाठी घेतला होता. सार आणि असार काय आहे तसेच विचार,नरदेहाचे महत्व,भागवत कथेतील दृष्टांत, भोग, त्याग, सुखदुःख, आणि नामस्मरण, सेवाभाव, पुण्यस्मरणाचे महत्त्व अशा विविध अंगाने कीर्तनामध्ये निरोपण करून महाराजांनी पुढे
आई वडिलांचे किती उपकार आपल्यावर आहेत, हे सांगून सध्या काळाची गरज आहे, ती म्हणजे आई-वडिलांची सेवा करणे आई वडिलांची सेवा हीच परमेश्वराची सेवा आहे, असे अनेक उदाहरण देऊन समोरील भाविकांना श्रोत्यांना त्यांनी आपल्या कीर्तन सेवेतून मंत्रमुग्ध केले कै.लक्ष्मण तात्या हे नातेपुते गावचे माजी सरपंच स्व. रामचंद्र दादा भांड व माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती चंद्रशेखर भांड व स्व.हनुमंतराव भांड यांचे ते बंधू होते त्यांनी गेल्यावर्षी वयाच्या ८० व्या वर्षी देह ठेवला.
नातेपुते परिसरासह भांड परिवाराचे सर्व क्षेत्रांमध्ये संबंध असल्याने या कार्यक्रमास पाहुणेमंडळी नातेवाईक मित्रपरिवारासह सामाजिक राजकीय धार्मिक शैक्षणिक क्षेत्रातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.यावेळी दुपारी. १२:०५ वा. पुष्पवृष्टी करण्यात आली. यानंतर आरती पसायदान घेऊन महाप्रसाद होऊन कार्यक्रमांची सांगता झाली.
Comments
Post a Comment