#Chiplun:रंजीता चॅरिटेबल फाउंडेशन आयोजित गड किल्ला व गौरी गणपती सजावट स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ संपन्न
महादरबार न्युज नेटवर्क - विलास गुरव
रंजीता चॅरिटेबल फाउंडेशन आयोजित गड किल्ला स्पर्धा व गौरी गणपती सजावट स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ रविवार (दि.२७) रोजी सावरकर हॉल, चिपळूण येथे संपन्न झाला.
रंजीता चॅरिटेबल फाउंडेशनच्या अध्यक्षा रंजिता ओतारी गेली अनेक वर्ष विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवित आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून आपल्या भारतीय परंपरा आणि संस्कृतीचं जतन व्हावं या उद्देशाने गड किल्ला स्पर्धा व गौरी गणपती सजावट स्पर्धेच आयोजन केलं. संस्कृतीचं जतन करण्यासोबतच आपल्या शहरातील कलाकारांना त्यांच्या कलेच्या सादरीकरणासाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळावं हा ही त्यामागील हेतू होता. नेहमीप्रमाणे याही वर्षी सर्वांचा या स्पर्धेत चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी गणपती सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक वंदेश चव्हाण, द्वितीय क्रमांक केतन साळुंखे, तृतीय क्रमांक अनय कुडाळकर व गौरी सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक कमल जाडकर, द्वितीय क्रमांक सोनल कारेकर, तृतीय क्रमांक अभी भुरटे तसेच उत्तेजनार्थ हर्षदा सागवेकर, राज गुरव, मंगेश भडवळकर, प्रतीक बैकर यांनी यश मिळवले. तर गड किल्ला स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रणव जानवलकर, द्वितीय क्रमांक सुजल कुळे, तृतीय क्रमांक भावेश जुवळे तर उत्तेजनार्थ विद्या भारती स्कूल शिरळ, अनिरुद्ध कोळवणकर, सूर्यनगरी बाल मित्र मंडळ यांनी बक्षीस पटकावले.
यावेळी प्रमुख उपस्थिती इब्राहिम दलवाई काँग्रेस प्रदेश सरचिटणीस यांची होती. तसेच राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण, सीमा चाळके, दीपिका कोतवडेकर, अंजली कदम, शाहीर शाहिद खेरटकर, रश्मी सावर्डेकर या मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीना पारकर यांनी केले. रंजिता चॅरिटेबल फाउंडेशन सदस्य वनिता काशीद, नियाज सनगे, शिल्पा बुरटे, आश्रफ बेबल यांचे विशेष सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment