Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute:नातेपुते नगरपंचायत मार्फत वृक्षांचा प्रथम वाढदिवस साजरा


महादरबार न्यूज नेटवर्क - 
नातेपुते नगरपंचायतीच्या वतीने मागील वर्षी माझी वसुंधरा अभियान तसेच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर  यांच्या वाढदिवसानिमित्त शंभर वृक्ष लावण्यात आले होते. त्यापैकी आज रोजी 90 वृक्ष जगले आहेत. वृक्षांचा वाढदिवस नाविन्य पूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या वाढदिवसानिमित्त पाच केशर आंब्याचे वृक्ष लावण्यात आले. मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी,' नातेवाईक, मित्र, आदर्श व्यक्तिमत्व यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करावे असे आवाहन केले.


नातेपुते नगरपंचायतीच्या वतीने माझी वसुंधरा अभियान तसेच स्वच्छ सर्वेक्षण यांच्या निमित्ताने इथून पुढे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यावेळी नगरपंचायत चे मुख्याधिकारी माधव खांडेकर व नगरपंचायतीतील सर्व कर्मचारी सेवक वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments