Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepte:महा किड्स चे ध्वजारोहण नवनिर्वाचित सदस्य सौ.निशाताई सरगर यांच्या हस्ते


महादरबार न्यूज नेटवर्क  - 
दि.26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण महा किड्स च्या नवनिर्वाचित सदस्या व प्रमुख पाहुण्या सौ.निशाताई सरगर यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी बोलताना सौ.सरगर यांनी संस्था कोरोनानंतर नवीन उभारी घेत आहे. सर्व पालक, शिक्षक, आणि सर्व  सदस्य मिळून  झालेले नुकसान येत्या काळात  भरुन काढू व संस्था पूर्वपदावर आनन्यास  सिर्वोत्तपरी  मदत करू असे आश्वासन त्यांनी दिले. महिलांसाठी हळदी-कुक, व सर्वांसाठी तिळगुळ कार्यक्रम ठेवण्यात आला होता. सर्व पालकांनी  उस्फुर्त सहभाग घेतला. स्कूल मधील मुलांनी कवायत आणि भाषणे केली. प्री-प्रायमरी गटातून प्रथम विकास नामदेव पवार, द्वितीय शंभूराज अंकुश पांढरे, तृतीय स्वराज संदीप कदम तर प्राथमिक विभागातुन प्रथम आरुष सुशील गांधी, द्वितीय आर्या राजेंद्र मुंजी, तृतीय श्रीशा शंकर बरडकर यांना देण्यात आला.


कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्री.शिवशंकर पांढरे, डॉ.अंकुश मोटे, श्री.जितेंद्र साळी, श्री सिताराम पांढरे, सौ अलका पांढरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काळे सर यांनी केले. तसेच समस्त शिक्षकवृंद  आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कष्ट  घेतले.

Post a Comment

0 Comments