#Natepute:दाते प्रशालेची साक्षी गोरे तालूक्यात प्रथम
महादरबार न्यूज नेटवर्क -
महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इ. १० वी परीक्षेचा निकाल लागला असून यामध्ये नातेपुते येथील डॉ.बा. ज. दाते प्रशालेचा ९६.८८ टक्के, चंद्रकांत घुगरदरे प्रशाला ९० टक्के तरश्रीमती रत्नप्रभा मोहीते पाटील प्रशालेचा ८९/८३% लागला आहे, यामध्ये नातेपुते एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. बा. ज. दाते प्रशालेत प्रथम क्रमांक साक्षी सुधीर गोरे (९७.४० टक्के), द्वितीय क्रमांक मृण्मयी आनंदकुमार लोंढे (९६.४० टक्के), उन्नती सचिन बोराटे (९६.४० टक्के) तर तृतीय श्रावणी तुकाराम भोमाळे (९६.२० टक्के). अक्षय शिक्षण संस्था संचलित चंद्रकांत घुगरदरे प्रशालेत प्रथम आदित्य संजित ऐवळे (९३. ८० टक्के), द्वितीय रामेश्वरी राणोजी सुतार (९१.२० टक्के), तृतीय ऋतुजा महेश लाळगे (९०.४० टक्के) तर श्रीमती रत्नप्रभा मोहीते पाटील प्रशालेत प्रथम कु.मुलाणी सना नजीर ९३/८०%, व्दितीय कु अल्दर नम्रता अशोक ९१%,तृतीय कु सय्यद आफ्रिन अक्तर ८७/६०%; असे गूण मिळालेल्या यशस्वी विद्यार्थाचे मूख्याध्यापक प्रविण बडवे, उपमुख्याध्यापक विठ्ठल पिसे, मुख्याध्यापक रवींद्र चांगण ,उबाळे सर यांनी कौतूक केले.
तसेच डाॅ.बा.ज.दाते प्रशालेची साक्षी सूधीर गोरे हि विद्यार्थीनी९७/४० गूण मिळवत माळशिरस तालूक्यात प्रथम आली आहे.
Comments
Post a Comment