#Natepute:नातेपुते कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी बारामती येथील कृषी प्रदर्शन "कृषिक २०२३" ला सदिच्छा भेट दिली
महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते कनिष्ठ महाविद्यालयाचे पिक शास्ञ विभागाच्या विद्यार्थ्यांनी बारामती येथील प्रदर्शन "कृषिक २०२३" ला सदिच्छा भेट दिली.त्याठिकाणी इस्त्राईल पद्धतीची शेती व शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेतली.
ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.निलेश नलावडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना शेती ही आता पारंपारिक पद्धतीने करण्याऐवजी नवनवीन कृषी तंत्रज्ञान आत्मसात करावे असा सल्ला दिला .
सदर भेटीचे आयोजन नातेपुते कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य.भारत पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली,पिक शास्ञ विभागाचे प्रा.श्री.अमोल जावीर व रसायनशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका.संगिता पालवे यांनी केले.
Comments
Post a Comment