महादरबार न्यूज नेटवर्क -
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत नातेपुते ग्रामीण रुग्णालयास माळशिरस तालुका शिवसेनाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत व जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांच्या सहकार्याने नातेपुते ग्रामीण रुग्णालयास अद्यावत अशी रुग्णवाहिका मिळाली आहे या नवीन रुग्णवाहिकीचे पूजन नातेपुते नगरपंचायत च्या नगराध्यक्षा उत्कर्षाराणी पलंगे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, माळशिरस तालुका शिवसेनाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील, नगरसेवक बी वाय राऊत, पंचायत समितीचे सदस्य माऊली पाटील, नगरसेवक रावसाहेब पांढरे, रणजीत पांढरे आदी मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले.
यावेळी डॉ. नरेंद्र कवितके, डॉ.सातव, समीर शेख, फोंडशिरसचे सरपंच पोपट बोराटे, हनुमंत शिंदे, सतीश बरडकर, मनोज जाधव, पोपट शिंदे आदि उपस्थित होते अद्यावत रुग्णवाहिकेमुळे या परिसरातील गरीब रुग्णांना तसेच अपघात ग्रस्त रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचण्यासाठी मदत होणार आहे या अगोदरही नातेपुते ग्रामीण रुग्णालयास आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सेल काउंटर, ऑटोलायझर या दोन मशनी रुग्णांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.
यावेळी नगरसेवक बी वाय राऊत म्हणाले नातेपुते सारख्या एका ग्रामीण भागातील ग्रामीण रुग्णालयाला अद्यावत अशी रुग्णवाहिका मिळाल्यामुळे या परिसरातील रुग्णांची रुग्णालयात वेळेत पोहोचण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत होणार आहे या सेवेमुळे अनेक जणांचे प्राण वाचणार आहेत हिवरकर पाटील यांच्या प्रयत्नामुळे व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून अद्यावत रुग्णवाहिका मिळाली आहे.
0 Comments