महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते नगरपंचायत हद्दीतील विविध विकासकामांच्या निधीसाठी नगराध्यक्षा उत्कर्षाराणी पलंगे,उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख,सार्व.बांधकाम सभापती अतुल पाटील,स्वच्छता व पाणी पुरवठा सभापती रणजीत पांढरे,नगरसेविका सविता बरडकर यांनी शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडील थेट विकास निधीची मागणी केली.
यावर शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी या मागणी सोबत शिफारस जोडून शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख,शिवसेना नेते शिवाजी सावंत यांच्याकडे मागणी केली त्यांनी तात्काळ शिफारस देऊन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे विकास निधीसाठी मागणी केली.आरोग्यमंत्री तानाजी सावंत,प्रा.शिवाजी सावंत यांच्या विशेष प्रयत्नातून नातेपुते नगरपंचायतीला २१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला.
प्रभाग ५ श्रीराम हाऊसिंग सोसायटी काँक्रीटरस्ता,शंकराव कॉम्प्लेक्स ते सचिन ठोंबरे,आपोलो टायर शोरूम,माळी बिल्डिंग ते पदमन वर्कशॉप अंतर्गत गटार व काँक्रीट रस्ता,प्रभाग ७,८,९भाजी मंडई बाजारतळ सुशोभीकरण,काँक्रिटीकरण,भोजराव हिवरकर ते मांडवे रस्ता डांबरीकरण,प्रभाग ८ डांबरीकरण,प्रभाग १३ मुलाणी घर ते समाजभूषण नानासाहेब देशमुख तालीम.
0 Comments