#Karunde:नाथ बाबा चे चांगभले च्या गजरात कारूंडे यात्रा संपन्न
कारूंडे येथील श्रीनाथ यात्रेसाठी महाराष्ट्र सह देशभरातून भाविक भक्तांची उपस्थिती
महादरबार न्यूज नेटवर्क -
कारूंडे तालुका माळशिरस येथील श्रीनाथ यात्रा नाथबाबा चे चांगभले , नाथबाबाच्या घोड्याचे चांगभले च्या गजरात उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाली.
श्रीनाथ यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे श्रीनाथमंदिर जागृत देवस्थान असून नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे देशभरातून भक्त कारुंडे येथील श्रीनाथ यात्रेसाठी उपस्थित राहतात.या यात्रे मध्ये भाविकांनकडून सुमारे 3 ते 4 टन गुलालाची उधळण केली जाते.
माळशिरस तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा भरते.
श्रीनाथ देवाच्या यात्रेला १० एप्रिल पासून सुरुवात झाली असून ११ एप्रिल रोजी रात्री दहा वाजता हळदीचा कार्यक्रम झाला, गुरुवार १३ एप्रिल रोजी रात्री दहा वाजता श्रीनाथ व देवी जोगेश्वरी यांचा लग्न सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात उत्साहात पार पडला, १४ एप्रिल रोजी महानैवद्यय झाल्यानंतर १५ एप्रिल रोजी सकाळी देवाचा छबिन (पालखी) निघाली या पालखीवर व देवाच्या घोड्या वर भाविकांकडून गुलाल व खोबरे उधळण्यात आहे .
यावेळी श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत आजी माजी सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सर्व सदस्य, यात्रा कमिटीचे सर्व सदस्य पोलीस पाटील, ग्रामविकास अधिकारी , ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात आलेल्या भाविकांच्या सोयीसाठी सुविधा पुरवल्या.
आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा उपलब्ध केल्या होत्या. तसेच नातेपुते पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Comments
Post a Comment