#Natepute:हिवरकर पाटील यांच्या प्रयत्नाने महिलेची मोफत शस्त्रक्रिया


महादरबार न्यूज नेटवर्क -
आरोग्यमंत्री तानाजी सावंत,जिल्हा संपर्कप्रमुख शिवसेना नेते प्रा.शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील शेवटच्या घटकापर्यंत रुग्णसेवा पोहोचवीत आहेत.
संगीता युवराज साळवे रा.पळसमंडळ ता.माळशिरस वय ४७ शेतमजुरी करणारे कुटुंब,संगीता साळवे या घराच्या ओठ्यावरून उतरत असताना पायात पाय अडकून पडल्याने त्यांच्या डाव्या खुब्यातील बाॅल तुटून दुखापत झाली होती.खाजगी रुग्णालयामध्ये या शस्त्रक्रियेसाठी अडीच लाखांपर्यंतचा खर्च सांगण्यात आला होता.इतक्या मोठ्या रकमेची शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती देखील नाही.


शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी नुसतं फोनवरून शस्त्रक्रियेची आखणी केली कोणतीही अडचण आली नाही.अकलूज येथील कदम हॉस्पिटल येथे मोफत शस्त्रक्रिया पार पडली. सध्या असलेले सरकार रुग्णांसाठी विविध योजना राबवीत आहे.हिवरकर पाटील नुसतेच आरोग्याचेच प्रश्न नाही तर बांधकाम कामगाराच्या अडचणी देखील सोडविण्यास सर्वांना सहकार्य करीत असल्याची प्रतिक्रिया रुग्ण संगीता साळवे यांचे भाऊ संदीप भागवत तालुकाध्यक्ष,जय महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना यांनी व्यक्त केली.

शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील,शहर उपप्रमुख पोपटराव शिंदे यांनी रुग्ण संगीता साळवे यांची विचारपूस केली.डॉ.अंजली कदम यांचे आभार व्यक्त केले.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील,डॉ.अंजली कदम,शहर उपप्रमुख पोपटराव शिंदे,तालुकाध्यक्ष जय महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना संदीप भागवत,उपाध्यक्ष बांधकाम कामगार संघटना राजू जाधव,सचिव माऊली देशमुख,नातेवाईक जगूबाई भागवत,सोमनाथ साळवे,उषा पवार,सुवर्णा मकरे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत