#Natepute:आरोग्य विभागात आरोग्य सेवेसाठी राजकुमार हिवरकर पाटील यांचे मोलाचे योगदान : डॉ.एम.पी. मोरे
महादरबार न्यूज नेटवर्क -
मिनिस्ट्री पासून ते खालच्या पर्यंत आरोग्य विभागाकडे आत्तापर्यंत कोणीही लक्ष दिले नाही. बजेट देतानाही कमी बजेट दिले जाते. तसे पाहिले तर आरोग्य विभाग सगळ्यात महत्त्वाचा विभाग मानला जातो हिवरकर पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात लक्ष घातल्यापासून येथील सुधारणा झालेल्या दिसतात. महिन्याला दहा ते बारा सिजर होतात. बाहेर या सिजरला तीस ते चाळीस हजार रुपये जातात मात्र हे सिजर ग्रामीण रुग्णालयात मोफत होत असल्याचे मत माजी वैद्यकीय अधिकारी डॉ.एम.पी. मोरे यांनी व्यक्त केले.
ते नातेपुते येथे महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज व महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयात एक कोटी निधीच्या अत्याधुनिक ऑपरेशन थेअटरच्या लोकार्पण सोहळा व बचत गटातील महिला, बांधकाम कामगार यांची मोफत तपासणी शिबिराप्रसंगी बोलत होते. यावेळी पुढे बोलत असताना डॉ.एम.पी. मोरे म्हणाले की, आरोग्य मंत्री पदचा पदभार स्वीकारल्यानंतर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयाला पहिली भेट दिली. त्यावेळेस आम्हाला वाटले ते येतील पाहणी करतील व जातील परंतु त्यांनी खूप खोलात जाऊन येथील रुग्णालयातील पाहणी केली त्यावेळेस सर्वांचीच खरडपट्टी झाली. त्यावेळेस पासून आम्ही चांगला धडा शिकलो असल्याचे डॉ.एम.पी. मोरे यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्याचे सिव्हील सर्जन धनंजय पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गुडे, तालुका वैद्यकीय अधिकारी रामचंद्र मोहिते,माजी वैद्यकीय अधिकारी डॉ.एम.पी. मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.नम्रता व्होरा, माळशिरस तालुका शिवसेनाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील, नगरपंचायतीचे नगरसेवक तथा सार्वजनिक बांधकाम सभापती अतुल पाटील, भैय्यासाहेब देशमुख, शंकरराव हिवरकर पाटील, पोपटराव शिंदे, दादाभाई मुलांनी, मुन्ना मुलाणी, पिल्लू पिसे, धीरज नाळे, विनायक शिंदे, तालुक्यातील जय महाराष्ट्र कामगार बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप भागवत, उपाध्यक्ष राजू जाधव, सचिव माऊली देशमुख, सागर साळुंखे आदी. मान्यवर व शिवसैनिक उपस्थित होते.
या दवाखान्यात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी जवळपास एक कोटी रुपयांचं अत्याधुनिक असं पुणे मुंबईच्या धरतीवर एअर कंडीशन युक्त ऑपरेशन थेटर मंजूर केल्यामुळे सर्व सामान्य गोरगरीब, दिन दलित माझ्या माता भगिनींना याचा लाभ होणार आहे. आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत, सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांचा आरोग्याचा संकल्प गोरगरिबाच्या घरापर्यंत पोहोचत आहे. आरोग्याच्या ज्या सुविधा शहरात मिळतात त्या सुविधा ग्रामीण भागात ग्रामीण रुग्णालयात मिळाल्या पाहिजेत हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काम त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने माता भगिनी व गोरगरीब जनतेला मदत व सहकार्यासाठी त्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभा राहणार.
राजकुमार हिवरकर पाटील ( माळशिरस तालुका शिवसेनाप्रमुख )
Comments
Post a Comment