राजामाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची ३१ मे रोजी जयंती आहे . या जयंती निमत्त विनम्र अभिवादन ! अहिल्यादेवी यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी चौंडी ता - जामखेड जिल्हा अहमदनगर येथे झाला . त्याचा कार्यकाळ १ ७६७ ते १७९५ होता . त्या शुरवीर खंडेराव होळकर यांच्या पत्नी व सुभेदार मालेराव होळकर यांच्या मात्रोश्री होत्या . मुत्सद्दी अहिल्यादेवी म्हणजे तळपती समशेर आणि लखलखती वीज होती . लोककल्याणकारी कार्य करत असताना त्यांनी प्रदेशाची मार्यादा न ठेवता संपूर्ण भारतात काम केले . त्याचे कर्तृत्व , काम, जनतेविषय आदर , सदभावना , प्रत्येक गरीबांना जास्तीत जास्त सुखाने जगता यावे ह्या साठी सतत तळमळ , धर्मनिरपेक्षता ' लोक कल्याणकारी राज्याची निर्मिती, दया शमा शांती, या अजरामर कर्तृत्वासाठी जनतेने त्यांना लोकमाता , राजमाता, विरांगणा पुण्यश्लोक , देवी , गंगाजळ निर्मळ, कुशल प्रशासक राज्य शासक, मातोश्री ह्या पदव्या जनतेने दिल्या आहेत . कुठलाही पदवीदान समारंभ न घेता या पदव्या दोनशे वर्षे ठिकून आहेत . त्याच्या या जयंती निमित्त .त्याच्या कार्याचा स्मरण होऊन कृतीत उतरविणेसाठी त्यांच्या कार्याचा उजाळा करू या ! १ त्या धार्मिक होत्या परंतू धर्माध नव्हत्या त्यानी धार्मिक कार्यात नदी वर बऱ्याच ठिकाणी घाट बांधले २ - -पिण्याचे पाणी जनावरांना पाण्यासाठी देवस्थान व त्याचे रोडवर विहीरी बांधल्या ३ -धार्मिक भावना जपताना अनेक ठिकाणी देवळे , दर्गा बांधले व जुन्याचे संवर्धन जीणोद्धार केला . ४- प्रवासी पर्यटक वारकरी यांना राहणेसाठी धार्मिक स्थळे शहरात धर्मशाळा बांधल्या ५ - गोरगरीब धार्मिक जनता यांना पाणपोई , अनछत्र उभारणी केली . ६- अपार शहानपण, दुरदुष्टी आणि तडफ असणाऱ्या कुशल राज्यशासक असणारी अलौकीक स्त्री म्हणून अजरामर आहेत. ७ - भांडण, तंटा , कलह चा अभ्यास करून अचूक न्यायदानाचा हातखंडा होता व हे मिठविण्यासाठी गावोगाव पंचायत स्थापना केल्या . ८- कुशल राजनितीच्या कुशल नेत्या व एका नजरेत हिशोब करण्यात तरबेज असलेली एकमेव राणी होत्या ९ - त्या स्वतः रणांगणात , युद्धात उतरत , तोफा ओतने गोळा तयार करणे , तीरबाजी ' तरलवारबाजी ' घोडेस्वार चे कौशल्य होते व त्यांनी त्यांचे राज्यात प्रथमथः स्त्रीयांचे सैन्यदल ची उभारणी केली . १०- नैसर्गिक अपत्ती , महापूर, टोळधाड' गाराचा पाऊस , अवर्षन, फौजेच्या हालचालीमुळे पिकाचे नुकसान अशावेळी आहिल्या बाई आपल्या प्रजेस शेतकरी वर्गात शेतसाऱ्याची सुट देत असत नैसर्गिक अपत्ती मध्ये मदत धोरणाच्या उदगात्या म्हणून ओळखले जाते . ११- कृषि व इतर वस्तू माल आयात व निर्यात करणे वाढविणे व कर चे त्यांनी सर्वात प्रथम धोरण आवलंब करण्या राजनेत्या होत्या . १२- अनाथ, दिव्याग व असहाय्य लोकांना मदत पूर्नवसन करणाऱ्या पहिल्या राणी म्हणून ख्याती आहे . १३-- टपाल सेवा करून टपाल सेवेच्या जनक म्हणून त्यांना ओळखले जाते . १४- राज्यात प्रथमथः हुंडाबंदीसाठी त्यांचे राज्यात कायदा करून आर्दश निर्माण केला १५- राज्यातील प्रजेची गाय , शेळी, मेंढी चाखण्यासाठी जमिनी राखून ठेवल्या . १६ - वनाचे वनराई ला राष्ट्रीय संपत्ती घोषीत करून वन्यप्राणी संरक्षणासाठी अभयआरव्य आखण्याची संकल्पना मांडून कृतीत आणणारी पहीली राणी प्रचीती आहे. १७ - विद्ववत्ता मध्ये आहिल्या कामधेणू व वत्स या ग्रंथाचे लिखान केले व ब्रम्हपुरी सारखे विश्वविद्यालय उभारणी केली. १८- स्त्रियांना दत्तक मुलगा घेण्याची प्रथम परवानगी देणाऱ्या राणी म्हणून समाजीक बांधीलकी जोपणारी एकमेव राणी होत्या . १९- समाजातील वंचीताना भिल्ल ' गौंड समाज प्रवाहात आणून त्यांना स्वराज्यांचे रक्षक बनविले . २० - दळवळन व्यापार आयात निर्यात साठी रस्ते पुल उभारणऱ्या एकमेव कुशल राज्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध आहेत. २१- वृक्षारोपन , आंबराई ' बगीचे बाधून निसर्गाचे परिसंस्थेचे संरक्षण केले. अशा प्रकारे अमुल्य कार्यकरणाऱ्या वंदनीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पवित्र कार्यास व स्मृतीस विन्रम अभिवादन !! " राण्या असंख्य झाल्या या जगात ! पण पुण्यश्लोक कोणीही नाही ! गर्व जिचा आहे या मराठी हदयाला ! एक ती महाराणी अहिल्यादेवी होळकर होऊन गेली !... लेखन-- कु. तृप्ती तानाजी वाघमोडे(मु. पो.ता.माळशिरस,जि. सोलापूर,मो.नं.९७६६८२१६९८)
0 Comments