#Natepute:डॉ.बा.ज. दाते प्रशाला व नातेपुते कनिष्ठ महाविद्यालय नातेपुते मध्ये २५ वर्षांनी भेटले जुने वर्गमित्र
महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते येथील डाॅ.बाळकृष्ण जयंवंत दाते प्रशाला नातेपुते येथे शिक्षण घेतलेल्या तत्कालीन विद्यार्थ्यांचा अकरावी,बारावीचे, वर्ग 25वर्षांनी भरला. तत्कालीन शिक्षकांनी आपल्या खास शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थीही आठवणीत रममाण झाले. यावेळी दैवतासमान शिक्षकांना माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते सन्मान करुन गौरविण्यात आले. कामाची पावती असल्याने भावना आले. शिक्षकांनी व्यक्त केली. मे महीन्याच्या सूट्टीमूळेच विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी २५ वर्षांनी विविध शहरातून सर्व जुने वर्गमित्र -मैत्रिणी ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी प्रशालेच्या प्रांगणामध्ये एकत्र आले होते.
यावेळी खूप वर्षानी भेटल्याने काही चेहरे सूरूवातीला अनोळखी वाटले,परंती काही वेळाने ,जून्या आठवणीत सर्वजण रममाण झाले,हा माझा वर्ग,हा माझा बेंच,एकमेकासोबत एकञच खाल्लेवा जेवणाचा डबा,दंगा मस्ती,शिक्षकाॅनी केलेली शिक्षा, अशा आठवणीत दिवस कसा गेला समजले नाही.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली यावेळी प्राचार्य एम.बी. होळ सर तसेच सी. एल. कुलकर्णी सर, डी.आर. कुलकर्णी सर ,मुख्याध्यापक व्ही .एस.पिसे सर, शिक्षकेतर कर्मचारी महावीर वसगडेकर उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य होळ सर यांची श्री रवींद्र ननवरे यांच्या अनुमोदनाने निवड करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष पवार तर मनोगत सोपान मोहिते,जहांगीर मुलाणी यांनी केले सर्व मान्यवरांचे आभार सचिन उराडे यांनी मानले तर सूत्रसंचालन सोमनाथ दडस यांनी केले उपस्थित सर्व गुरुवर्य यांना हार शाल श्रीफळ व श्री विठ्ठल मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जहांगीर मुलाणी,संतोष पवार ,सचिन उराडे ,रवींद्र ननवरे ,सोमनाथ दडस,ज्ञानेश्वर जोरे ,श्रीकांत कुचेकर, शशिकांत होडगे ,दीपक पिसे, ताराचंद चांगण, धनाजी खुसपे,त्याचबरोबर जगदेवी वाघ, अहिल्या पिसे, वैशाली सोरटे, सविता सोनवळ यांनी विशेष परिश्रम घेतले स्नेह मेळाव्यासाठी ४१ माजी वर्ग मित्र-मैत्रिणी उपस्थित होते
Comments
Post a Comment