#Natepute:राजकुमार हिवरकर पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे नातेपुतेतील जुन्या पालखी मार्गासह विविध कामांना मंजुरी


महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते मधून जाणाऱ्या जुना पालखी मार्ग तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील  यांच्या कारकिर्दीत रस्त्याच्या मध्यभागापासून (डिव्हायडर) पासून उजव्या बाजूला ३० मीटर व डाव्या बाजूला ३० मीटर या पद्धतीने झाला होता सदर रस्ता त्याच पद्धतीने रुंदीने करावा याबाबत केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून जुन्या पालखी मार्गाला मंजुरी सह विविध मागण्यांना यश आले असून जुन्या पालखी मार्गाचे लवकरच पहिल्यासारख्याच रुंदीने डांबरीकरण होणार असल्याचे माळशिरस तालुका शिवसेनाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी नातेपुते येथील शिवसेना भवन येथे पत्रकार परिषदेत सांगितले जुन्या पालखी मार्गासह विविध कामाच्या मागण्या मंजूर झाल्याबद्दल प्रोजेक्ट मॅनेजर किशोर घोडके यांचा तालुका शिवसेनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

जुन्या पालखी मार्गासह ब्रिटिश कालीन जुना मांडवे रस्ता  बंद न करता त्याला सिग्नल लावून स्पीड ब्रेकर करून तो नागरिकांसाठी बायपास चौकातून खुला करण्यात आलेला आहे पुरंदावडे गावांमध्ये ग्रामीण रुग्णालयात जाण्यासाठी रस्त्याची मागणी केली होती तोही रस्ता मंजूर झाला आहे गावातील  रस्त्याच्या उत्तरेला  हिंदू स्मशानभूमी व दक्षिणेस मुस्लिम दफन भूमी कडे जाण्यासाठी दक्षिण व उत्तर दिशेस राहणाऱ्या लोकांना लांबून जावे लागत होते हे अंतर कमी करण्यासाठी स्मशानभूमी नजीक असणाऱ्या पुलाच्या खालून बायपास करून तो रस्ता बनविण्यास मंजुरी मिळाली आहे या सर्व मागण्यासाठी हिवरकर पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते तथा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा करून विविध कामाला न्याय मिळवून देण्याचे काम शिवसेनेच्या माध्यमातून केल्याचे हिवरकर पाटील यांनी सांगितले माळशिरस तालुक्याला वाढीव निधीसाठी रखडलेली काम पूर्ण करून घेण्यासाठी निधीची तरतूद केल्याबद्दल रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे शिवसेनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम