#Varvand:यवत ते वरवंड दरम्यान पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्त्यावर खड्डे
महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर
पुणे सोलापूर हा मार्ग राष्ट्रिय माहमार्ग वर सर्व प्रकारच्या लहान व मोठ्या वाहनाची वाहतूक जास्त प्रमाणात आहे. पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील सेवा मार्गावर यवत व वरवंड हदीत लहान मोठे खड्डे झाले आहेत. वरवंड या गावातील दक्षिणेला हा मार्गवर मोरी लागतच खड्डे आहेत संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांची पालखी काही दिवसाच्या अंतराने यवत, वरवंड मुक्कामी या ठिकाणी येणार आहे व सेवा मार्ग असे खड्डे असताना वारकऱ्यांची गैरसोय होणार आहे तरी प्रशासनाने गोष्टीकडे लक्ष धवे . पाट्स येथील टोल कम्पनी प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे, या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना या ठिकाणच्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. मागील काही दिवसात या खड्डयामुळे दुचाकी स्वरांचे लहान अपघात झाले आहेत. यामुळे पुढील काळात या मार्गावरील खड्ड्यांमुळे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, टोल प्रशासन वार्षिक जमा खर्चात वर्षाकाठी महामार्ग देखभाल व दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे, पण महामार्गावरील दुरुस्ती खर्च योग्य प्रकारे केला जात आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे,
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील यवत ते इंदापूर पर्यंतच्या मार्गाची देखभाल व दुरुस्ती करण्याची जवाबदारी पाटस टोल प्रशासनाकडे आहे, रस्ता दुरुस्ती करत नाहीत कासुरडी ते यवत ,वरवंड पर्यंत लहान मोठे खड्डे झालें तसेच यवत मध्ये सेवा मार्गावर दुरुस्ती झाली नाही दुरुस्तीच्या दर्जाकडे डोळे झाक केली असल्याने वाहन चालक व नागरिकांमध्ये नाराजी सूर उमटले , प्रशासन मार्गावरील वाहन चालकांकडून टोल वसुली करतांना या सुविधा चा कम्पनी ला विसर पडलेला दिसत आहे, संबंधित कंपनी व अधिकाऱ्यांनी महामार्गावर योग्य प्रकारे दुरुस्ती व प्रवाशांना सुविधा देण्यात याव्यत अशी मागणी वाहन चालक व्यक्त करत आहेत.
Comments
Post a Comment