#Yavat:आठवडे बाजारला उन्हाचा फटका !
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दौंड तालुक्यातील यवत ,वरवंड येथील असणाऱ्या आठवडे बाजारात उन्हाचा तडका बस्तान दिसत आहे. यवत पुणे सोलापूर महामार्गावरील मोठे गाव आहे .या गावातील बऱ्याच वर्षापासून आठवडे बाजार हा भरत आहे परंतु वाढणाऱ्या तापमान मुळे असणारा आडवडे बाजारात नागरिकांची गर्दीत तुरळक दिसत आहे.
नागरीक उन्हामुळे दुपारी घराबाहेर येत नाहीत त्यामुळे बाजारलातील व्यापारी लोकांना फटका बसत आहे दुपारच्या उन्हामुळे नागरिक बाहेर पडत नसल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होते.आर्थिक उलाढाल मोठी होत असते. काही जणांचे आठवड्यातचे
व्यवहारीक गणित यावर अवलंबून असते .
यवत परीसरत हा मोठा भरणारा बाजार आहे.सांयकाळी ६ नंतर नागरिक बाहेर पडतात व ८ पर्यंत थोडीफार गर्दी होत असते.
यवत येथील बाजारातील भेळ सर्वत्र फेमस आहे परन्तु त्याना पण उन्हाचा फटका बसत आहे .
फळ भाजी पाला व इतर दुकानांना तापमान वाढीचा फटका बसत आहे. जास्त ऊन सकाळी ११ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असते त्याचा परिणाम भाजी फळ कापड, ,धान्य , विक्रेते यांना यांना बसत आहे. असल्याने ,संध्याकाळपर्यन्त भाजी सुकतात त्या विकण्यासाठी विक्रेत्यांना कसरत करावी लागते .
भाजी विक्रते दीपक शिंदे
Comments
Post a Comment