#Yavat:थोरात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा कापडी पिशव्या वापरण्याचा संकल्प
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्या वापरल्या तर पर्यावरणाच्या प्रदूषणास मोठ्या प्रमाणात आळा बसेल, असे मत भैरवनाथ शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष मा. भाऊसाहेब ढमढेरे ह्यांनी आज( २८)रोजी खुटबाव येथे व्यक्त केले. पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालयातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना कापडी पिशव्या देऊन आगळ्यावेगळ्या पद्धतीने निरोप देण्यात आला. ह्या निरोप समारंभाच्या निमित्ताने ते बोलत होते.
ह्या उपक्रमाच्या संयोजिका प्रा. योगिता दिवेकर ह्यांनी कापडी पिशव्यांच्या वापराबाबतची संकल्पना स्पष्ट केली. वैष्णवी बंड, कीर्ती बधे, आकाश कोळपे, ओंकार सुतार, सूरज शेळके, कार्तिकेय कोंडे तसेच इतर अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातील हृदयस्पर्शी आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पल्लवी तांबोळी ह्यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जगदीश आवटे हे होते. सुकन्या अवचट व साई दीक्षित ह्यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. तेजस टेंगले ह्यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment