#Chiplun:आ. शेखर निकम यांच्या उपस्थितीत मुंबई - गोवा महामार्गावर वृक्ष लागवडीबाबत बैठक
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
आ. शेखर निकम यांच्या सावर्डे येथील जनसंपर्क कार्यालयात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ चे अभियंते, ठेकेदार, अधिकारी वर्ग, संबंधीत गावांचे सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत महामार्गाच्या दुतर्फा वृक्षलागवड करणेबाबत बैठक संपन्न झाली.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या परशुराम ते संगमेश्वर भागातील रस्त्याच्या दुतर्फा असणारी अनेक मोठ-मोठ्या वृक्षांची तोड करण्यात आली. या भागातील महामार्गाचे काम अंतिम टप्यात आले असून महामार्गाच्या दुतर्फा पुन:श्च वृक्ष लावणे महत्वाचे असल्याने आमदार शेखर निकम यांनी महामार्ग अभियंता, अधिकारी वर्ग, संबंधीत गावचे सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थ यांची आपल्या कार्यालयात बैठक आयोजित करून वृक्ष लागवड करण्याबाबत चर्चा केली. यामध्ये महामार्गाच्या दुतर्फा मोकळ्या जागेत आंबा, काजू, फणस, जांभूळ, चिंच, बकुळ, वड, पिंपळ व अन्य अशी झाडे १२ मिटर अंतरावर एक झाड लावण्याचे नियोजन करण्यात आले. जून महिन्याच्या अखेर पर्यंत खेरशेत, असुर्डे, आगवे, सावर्डे, कोंडमळा, कामथे, कापसाळ, आंबेड खुर्द, धामणी, गोळवली, तुरळ, शिंदेआंबेरी व आरवली या ठिकाणी वृक्ष लागवड करण्याचा निर्णय झाला.
यावेळी पर्यावरण प्रेमी शौकतभाई मुकादम, चिपळूण तहसिलदार प्रविण लोकरे, चिपळूण डि.वाय. एस.पी. राजेंद्रकुमार राजमाने, देवरुख नायब तहसिलदार एस.जी.पंडित, महामार्ग उप-अभियंता आर.के. कुलकर्णी, देवरुख गट विकास अधिकारी भरत चौगुले, सहा. गट विकास अधिकारी चिपळुण बी.डी. कांबळे, विनोदकुमार शिंदे, चिपळूण वन विभागाच्या राजेश्री किर, प्राचार्य सुनितकुमार पाटील, हेमंत तांबे, सतिश कदम, असुर्डे सरपंच पंकज साळवी, तुरळ सरपंच सहदेव सुवरे, कडवई सरपंच विशाखा कुवलेकर, आरवली सरपंच निलेश भुवड, आगवे सरपंच जयंत घडशी, आंबव सरपंच शेखर उकार्डे, आंबेड खुर्द सरपंच चंद्रकांत फणसे, कापसाळ सरपंच सुनील गोरीवले, धामणी सरपंच संतोष काणेकर, कडवई उपसरपंच दत्ताराम ओकटे, धामणी उपसरपंच संगम पवार, दिनेश विचारे, समीर काझी, अधिकारी वर्ग, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment