Hot Posts

6/recent/ticker-posts

#Yavat: जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीच्या स्वागतासाठी यवतकर सज्ज


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन दौंड तालुक्यात दि १५ रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील यवत ,वरवंड या ठिकाणी तुकाराम महाराज यांच्या पालखीचे मुक्काम आहे. तेथील सर्व व्यवस्था पूर्ण झालेली आहे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे . यवत येथील पालखीचा मुक्काम श्री काळ भैरवनाथ मंदिरात आहे . यवत येथील पालखीच्या मुक्कामात सर्व ग्रामस्थ व देवस्थान कमिटी कडून सर्व सुविधा  करण्यात आलेले आहे असे देवस्थान समितीचे अध्यक्ष सतीश दोरगे पाटील यांनी दिली आहे. यवत येथील मुक्कामात वारकऱ्यांच्या भोजनासाठी पिठले भाकरीचा मेनू आहे,  ही खूप जुन्या काळापासून परंपरा आहे पिठलं भाकरी  बनवण्यासाठी स्वतंत्र मंडप तयार केलेला आहे .
 
पालखीसाठी प्रशासनाने यवत गावातील सर्व पथ दिवे जास्त प्रमाणात वाढवलेले आहेत. प्रशासनाकडून पाण्यात जंतू विरहित होण्यासाठीचे टीसीएल पावडर टाकून  निर्जंतुकरण केले आहे . गावातील रस्ते स्वच्छ केलेलेत प्रशासनाकडून मोबाईल चार्जिंग व्यवस्था व टॉयलेटची सुद्धा सुविधा करण्यात आलेली आहे. पोलीस प्रशासनाकडून जास्त प्रमाणात बंदोबस्त  नियोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे  . श्री काळ भैरवनाथ मंदिर पाठीमागे अंघोळीसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे पालखीचे नियोजन आगमन मा साठी यवत ग्रामपंचायत ग्रामस्थ सतीश दोडके पाटील माजी  उपसरपंच सदानंद दोरगे कैलास  दोरगे दत्तात्रेय दोरगे, दत्तात्रेय बोत्रे हे सर्व ग्रामस्थ नियोजनावर लक्ष ठेवून आहेत.

Post a Comment

0 Comments