#Yavat: इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पालखी उत्सवाचे आयोजन
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
काळ बदलत आहे तसेच शिक्षण व्यवस्था आहे शहराबरोबर ग्रामीण भागातही आता बऱ्याच प्रमाणात इंग्रजी माध्यमांच्या शैक्षणिक संस्था चालू झालेले आहेत. परंतु इंग्रजी माध्यमाच्या शैक्षणिक संस्था चालू असतानाही मराठी बांधवांचे सण उत्सव आहे त्याचे आयोजन करण्याचे काम यवत येथील मोरया एज्युकेशन सोसायटीने ठेवले आहे.
मोरया एज्युकेशन सोसायटी,यवत संचलित यवत हेरीटेज स्कूल च्या वतीने श्री काळभैरवनाथ मंदिर येथे पालखी सोहळा प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्यात ३ ते ४ वर्षाच्या चिमुकल्यांनी स्केटींग करत विठ्ठल- रुक्मीणी व तुकाराम महाराजांच्या भोवती प्रदक्षिणा करून अविस्मरण प्रदर्शन केले या कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सोनल मिस , संचालक रोहन दोरगे, प्रतिभा रोहन दोरगे यांच्यावतीने करण्यात आले होते यावेळी नर्सरी, एल.के.जी, यु.के.जी चे सर्व लहान विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.
Comments
Post a Comment