महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थित तिवडी येथील अनेक वर्ष नागरिकांची मागणी असलेला भटवाडी रस्ता भूमिपूजन, राळेवाडी रस्ता डांबरीकरण उदघाटन तसेच काही कार्यकर्त्यांनी जोमाने राष्ट्रवादी पक्षात स्वागत केले. यावेळी आमदार शेखर निकम म्हणाले कि आपण आज राष्ट्रवादी पक्षामध्ये स्वागत करत आहात आज आपण जो निर्णय घेत याचा कधीच तुम्हाला पश्चताप होणार नाही. आपणाला माहित आहे कि तिवरे धरण फुटी झाल्यानंतर दसपटी भागात पाणी समस्या भेडसावत आहे. मात्र जल जीवन मिशन अंतर्गत तिवरे, आकळे, कादवड गावातील योजना चालू असून येणाऱ्या काळात एखादा मोठा पाझर तलाव झाल्यास त्यातून मुक्तता मिळेल त्याचप्रमाणे मागील दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टी झाल्यानंर महत्वाचे ब्रिज व्हाऊन गेले मात्र महाविकास आघाडीचे सरकार आल्याने तुमच्या सहकार्याने व माझ्या प्रत्नातून कळकवणे , दादर, आकळे आणि नांदिवसे येथील ब्रिज करण्यात यश आले, तिवडी हे गाव सह्याद्रीच्या पायथ्याशी असून भविष्यात महाबळेश्वर सारखे पर्यटन क्षेत्र होईल.सह्याद्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांचा शिक्षणासठी कायम सहकार्य राहील. यावेळी सेनेतील जुने पदाधिकारी यामध्ये विजय पवार,संजय पवार, मोहन पवार, आबाजी पवार, अनिल पवार, अंनत पवार, तुकाराम पवार, सुधीर कदम, अतिश पवार, अनिल कदम, सचिंन पवार यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. यावेळी आमदार शेखर निकम यांनी गावातील विविध विकास कामे, अडीअडचणी, मार्गी लागण्याचा शब्द दिला. यावेळी ओवली सरपंच दिनेश शिंदे, सरपंच संगीत पवार, प्रकाश पवार, आबा पवार, गंगाराम पवार, अनिल पवार, शिवाजी शिंदे, चंद्रकांत अदावडे, संदीप पवार, अनिल कदम, सचिन पवार, नरेंद्र पवार, आत्माराम पवार, विठ्ठल मोरे, अनंत पवार, सचिन मोहिते, संदीप पवार, दशरथ पवार , प्रमुख गावकर व सर्व उपस्थित ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
0 Comments