महादरबार न्यूज नेटवर्क - प्रत्येक माणसाचे आयुष्य गुरुविना जीवन हे निष्काम असते. गुरु शिवाय कोणत्याही क्षेत्रात प्रगती अतिउच्च पदावर करता येत नाही. व चंदुकाका सराफ यांनी गुरुपौर्णिमेच्या महत्त्व जपलं असे प्रतिपादन ह भ प नवनाथ महाराज कोलवडकर यांनी व्यक्त केले. अनन्य साधारण गुरूचे महत्त्व असणाऱ्या या गुरुपौर्णिमेचा औचित साधून चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड बारामती शाखेने बारामती परिसरातील शिक्षक प्राध्यापक प्राचार्य व कीर्तनकार यांना खास निमंत्रित करून त्यांचा सन्मान चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. चे चेअरमन किशोर कुमार शहा सर व संचालिका नेहा किशोर कुमार शहा भाभी यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. चा प्रवास दोनशे वर्षाच्या पूर्णत्वाकडे करत आहे. महाराष्ट्रातील असंख्य ग्राहकांचे प्रेम आम्हाला मिळत असल्याचे प्रतिपादन चेअरमन, किशोरकुमार शहा यांनी केले. गुरु पौर्णिमेनिमित्त मळद येथील जिल्हा परिषद शिक्षक, माध्यमिक शिक्षक व प्राध्यापक तसेच हरिभक्त परायण कीर्तनकार महाराज यांना निमंत्रित करून गुरुपौर्णिमेनिमित्त सन्मान करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक श्री काका रोटे ,दत्तात्रय पांढरे, ज्ञानेश्वर काळे ,अविनाश भोसले ,बापू खरात अवंती पाथरकर ,अनघा कुलकर्णी, पल्लवी कांबळे ,माधुरी वाबळे ,निलोफर मोमीन, सलीम सय्यद (गायक) उमेश रणवरे ,श्री पाडवी सर ,हरिदास जगदाळे हरिभक्त परायण ,ज्ञानेश्वर गोळे ,नाना महाराज शिंदे ,हनुमंत भिसे ,विनोद खटके मनोज कुंभार ,विजय काळे, मनीषा कुंभार ,अर्चना खटके ,दीप्ती काळे ,सीमा गोसावी मॅडम व प्रभाकर गोसावी सर रणवरे मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांचा सन्मान केल्याबद्दल त्यांनी चंदुकाका सराफ अँड सन्स चे आभार देखील मानले. या कार्यक्रमासाठी बारामती क्लस्टर चे क्लस्टर मॅनेजर श्री दीपक वाबळे सर, मार्केटिंग विभागाचे कुमार राठोड, ब्रांच मॅनेजर रोहित आवदे, नवनाथ गिऱ्हे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन विनोद जगताप सचिन जाधव यांनी केले. सूत्रसंचालन व आभार धनंजय माने यांनी केले.
0 Comments