#Malshiras:पिलीव येथील महालक्ष्मी देवीच्या विकासासाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी अधिवेशनात लक्षवेधी

   
महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस
माळशिरस तालुक्यातील पिलीव  येथे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान  असलेल्या  महालक्ष्मी  देवी आहे.मात्र याठिकाणी  कसल्याही प्रकारच्या  सुविधा  उपलब्ध  नाहीत .यासाठी  आ रामभाऊ सातपुते  यांच्या  विशेष  प्रयत्नाने दोन कोटी रुपये  विकास  निधी  उपलब्ध  करुन  दिला आहे. मात्र याठिकाणी  भक्त  निवास,सुलभ शौचालय  ,रस्ते व इतर  सुविधा उपलब्ध  करुन  देणयासाठी  जागाच उपलब्ध  नाही. याठिकाणी  दोनशे  एकराच्या  आसपास  इनामी जमीनी आहेत .याठिकाणी  फेब्रुवारी  - मार्च  महीन्यात  जवळपास  पंधरा दिवस  मोठी यात्रा  भरते या यात्रेला कर्नाटक, आंध्र प्रदेश  व इतर जिल्हातुन लाखो भाविक व व्यापारी  येतात  परंतु  याठिकाणी  एवढया वर्ष  यात्रा भरुनही कसल्याही प्रकारच्या  मुलभुत  सुविधा  उपलब्ध  नाहीत. याठिकाणी  २०० एकराच्या आसपास इनामी जमीन आहे पण  तरीही  जागा देत नसल्यामुळे  सोयीसुविधा  उपलब्ध  करुन  देणे  शक्य नाही. याठिकाणी  भविष्यात  मोठी दुर्घटना  घडु शकते.याबाबत  तालूकयाचे आ रामभाऊ सातपुते यांनी  यात्रेच्या  ठिकाणी  आवश्यक  सुविधा उपलब्ध करुन  यात्रेचे योग्य  नियोजन  करण्याचे आदेश  सोलापूर  जिल्हा  प्रशासनाला  देणार  का? देवस्थानच्या  जमीनी संदर्भात  महसूल  प्रशासनाची बैठक  घेऊन  सदरचा प्रश्न  मार्गी लावणार का. अशी लक्षवेधी  आज अधिवेशनात  मांडली.

यावर सोलापूर  जिल्हाचे पालकमंत्री  तथा महसूल मंत्री  राधाकृष्ण विखे पाटील  यांनी  याविषयी सोलापूर  जिल्हा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली  समन्वय समिती  गठीत करुन  ताबडतोब  हा प्रश्न  मार्गी  लावुन  भाविकांना आवश्यक  सुविधा उपलब्ध  करुन  देण्याच्या  सुचना देणार आहे. तसेच  जमीनी संदर्भात  माहिती  घेऊन  योग्य  तो निर्णय  घेऊन योग्य  ती कार्यवाही  करण्यात येईल  असे आश्वासन  त्यांनी  दिले.                 

आमदार  रामभाऊ सातपुते  यांनी सदरचा विषय विधानसभेत‌ मांडल्यानंतर याविषयी  इनामी शेतकरी  बाबुराव  सोपान  पाटील यांना  याविषयी  विचारले असता याठिकाणी  महालक्ष्मी  देवीच्या  परीसरात  सोई सुविधा उपलब्ध  करुन  देणयासाठी  आवश्यक  असणारी जागा देणयास आमच्या  कोणत्याही  इनामी शेतकऱ्यांनचा अजिबात  कसलाही विरोध नाही.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत