Hot Posts

6/recent/ticker-posts

#Mumbai:आ. शेखर निकम यांनी मांडल्या कृषी मंत्र्यांसमोर आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
मा‌.  कृषी मंत्री महोदयांनी मा. सभापती विधान परिषद यांचे दालन क्र. 145 पहिला मजला विधान भवन मुबंई येथे बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत मंत्री महोदय, संबंधित आमदार, सचिव, आयुक्त, संचालक, सह संचालक, कृषी अधिकारी व इतर संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत या विषयी सखोल चर्चा झाली.

आमदार शेखर निकम यांनी या बैठकीत आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या व प्रक्रिया उद्योग याबाबत अभ्यासपूर्ण अड अडचणी मांडल्या. यामध्ये आंबा फळ पीक विकास, काजू फळ पीक विकास, व माझा शेतकरी मी त्याच्या बांधावर हे विषय बैठकीत मांडले.

बैठकीत काजू फळ पिकाच्या लागवडी पासून प्रक्रिया व विक्रीपर्यंत येणाऱ्या अडचणी विचारत घेऊन सर्वकष विकासाचे निश्चित केलेल्या धोरणाचा शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होणेसाठी उपाय योजना ठरविण्यात आल्या.

यावेळी मा.ना.श्री. धनंजयजी मुंढे, मंत्री (कृषी), मा.ना.श्री. उदय सामंत, मंत्री (उद्योग),  मा.ना. श्री. अदिती तटकरे, मंत्री (महिला व बालकल्याण) , आमदार राजन साळवी, आमदार नितेश राणे, आमदार अनिकेत तटकरे   , आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, (विपस), , मा.अप्पर मुख्य सचिव (कृषि) मा. आयुक्त कृषि संचालक, फलोत्पादन, विभागीय कृषि सहसंचालक, कोकण विभाग जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी उविभागीय कृषि अधिकारी, लांजा तालुका कृषि अधिकारी, लांजा व इतर संबंधित अधिकारी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments