#Mumbai:आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांतून चिपळूणसाठी साडे पंधरा कोटींचा निधी मंजूर


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
कोकणात पडणा-या अतिवृष्टीमुळे तसेच वादळी वा-यामुळे पुरपरिस्थिती तसेच दरड कोसळणे यामुळे खुप मोठ्या प्रमाणात रस्ते, संरक्षक भिंती इत्यादीचे नुकसान होते. त्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने, व इतर सुरक्षिततेच्या दृष्टीने सदर कामे होणे अत्यंत आवश्यक होते व ही कामे तातडीने व्हावी यासाठी मतदार संघातील जनतेचीही सततची मागणी होती. ही मागणी लक्षात घेऊन आमदार शेखर निकम यांनी याबाबतचा सततचा पाठपुरावा करुन ही कामे होणे किती महत्वाची आहेत याबाबत मा. मंत्री महोदयांना सबळ कारणे देत निधी मंजूर करणेसाठी विनंती केली होती. त्याचाच परिणाम म्हणून 2023-24 पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्य बजेट अंतर्गत चिपळूण तालुक्यासाठी रु. 15 कोटी 60 लाखाचा निधी मंजूर झाला आहे.

हा निधी मंजूर झाल्याने आमदार शेखर निकम यांनी मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मा. उपमुख्यमंत्री  अजितदादा पवार साहेब व मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण साहेब तसेच मा. पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांचे विशेष आभार मानले असुन याबाबत समाधान व्यक्त केले आहे.मंजूर निधीमध्ये सदर कामे मंजूर झाली आहेत.1.रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण तालुक्यातील गुहागर चिपळूण कराड रस्ता रामा 136 कि.मी. 70/00 ते 70/900 मध्ये संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे - रु 20 लाख,2. रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण तालुक्यातील गुहागर चिपळूण कराड रस्ता रामा १३६ कि.मी. ५८/२०० ते ५८/७००, ५८/९०० ते ५९/१००,५९/८०० ते ६०/२०० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे (७.०० मी. धावपट्टीचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे) - रु 90 लाख
3. रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण तालुक्यातील गुहागर चिपळूण कराड रस्ता रामा १३६ कि.मी. ६५/१०० ते ६८/२०० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे (७.०० मी. धावपट्टीचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे) - रु 2 कोटी 50 लाख,4. रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण तालुक्यातील गुहागर चिपळूण कराड रस्ता रामा १३६ कि.मी. ७०/९०० ते ७४/६०० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे (७.०० मी. धावपट्टीचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे) - रु 3 कोटी ,5. रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण तालुक्यातील गुहागर चिपळूण कराड रस्ता रामा १३६ कि.मी.६७/६०० ते ६७/९०० मध्ये संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे - 20 लाख,6. रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण तालुक्यातील गणेशखिंड सावर्डा दुर्गवाडी तळवडे रस्ता प्रजिमा ३३ कि.मी.३६/५०० ते ३९/३०० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे (३.७५ मी. धावपट्टीचे ५.५० मी. ला रुंदीकरणासह मजबुतीकरण व डांबरीकरण करणे) - 2 कोटी 50 लाख,7. रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण तालुक्यातील कळकवणे आकले तिवरे रस्ता प्रजिमा २६ कि.मी. ३/७५० व ४/१५० मध्ये संरक्षक भिंतीचे (गॅबीयन वॉल) बांधकाम करणे - 1 कोटी 80 लाख,8.रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण तालुक्यातील गणेशखिंड सावर्डा दुर्गवाडी तळवडे रस्ता प्रजिमा ३३ कि.मी. ३१/५०० ते ३४ /०० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे (३.७५ मी. धावपट्टीचे ५.५० मी. ला रुंदीकरणासह मजबुतीकरण व डांबरीकरण करणे) - 2 कोटी 50 लाख,9. रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण तालुक्यातील खेर्डी टेरव कामथे रस्ता प्रजिमा १०९ कि.मी.३/०१८ मधील कॉजवेच्या ठिकाणी लहान पुलाचे बांधकाम करणे - 2 कोटी. तसेच चिपळूण तालुक्यातील अनेक विकास कामांना निधी अभावी गती मिळत नव्हती. कामे रखडल्याने नागरिकही नाराज झाले होते. परंतु आमदार शेकर निकम यांनी 15 कोटी 60 लाखांचा भरघोस निधी आणल्याने आता तालुक्यातील विकास कामे मार्गी लागणार असल्याने आमदार निकम यांना चिपळूणकरांनी धन्यवाद दिले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम