#Chiplun:माखजन बाजारपेठेतील नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी १३ लाखांचा निधी मंजूर

व्यापारी,ग्रामस्थांनी मानले आ. शेखर निकम यांचे आभार                       

महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
तालुक्यातील गडनदीला प्रतिवर्षी येणा-या पुरामुळे माखजन बाजारपेठ व आरवली ब्राम्हणवाडी येथे पुराचे पाणी शिरून व्यापा-यांचे व ग्रामस्थांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. गेली अनेक वर्षे याबाबत उपाययोजना कराव्यात यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचेकडे पूरग्रस्त पिडीत व्यापारी व ग्रामस्थ मागणी करीत होते परंतू कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नव्हती.


                           जाहिरात 


पुरामुळे बाजारपेठ, व्यापारी व ग्रामस्थ यांचे होणारे नुकसान व त्यावर उपाययोजना करण्यासाठी आमदार शेखर निकम यांच्याकडे मागणी करण्यात आली. जिल्हा वार्षिक पुर नियंत्रण योजनेंतर्गत माखजन बाजारपेठ ते गडनदी विसर्जन घाट व आरवली ब्राम्हणवाडीपासून नदी पात्रातील गाळ काढण्यासाठी 25 लाखांचा निधी मंजूर करून आणला. नदी पात्रातील गाळ काढाला जाणार असल्याने याचा काही प्रमाणात फायदा व्यापारी व ग्रामस्थांना होणार असल्याने व्यापारी व ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांची भेट घेवून त्यांचे आभार मानले.

यावेळी माखजनचे सरपंच महेश बाष्टे, रुपेश गोताड, सुर्यकांत कोकाटे, कुलदीप भागवत, राकेश बाष्टे, अजीज आलेकर, तुषार रेडिज, गजानन पवार, महेश साठे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम