#Chiplun:विठ्ठलावरील श्रद्धा आणि एकनिष्ठतेमुळेच हजारो वारकरी पंढरपुरात एकत्र- आ.शेखर निकम
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
तुमची श्रद्धा आणि एकनिष्ठा विठ्ठलावर ठाम आहे, म्हणूनच या ठिकाणी दोन जिल्ह्यातुन हजारो वारकरी या ठिकाणी एकत्र आले असून आता अशी श्रद्धा आणि एकनिष्ठता तुमच्या व्यतिरिक्त कुठे राहिल्याचे दिसत नसल्याचे प्रतिपादन आ शेखर निकम यांनी पंढरपूर येथे केले. श्री क्षेत्र पंढरपूर येथे नामयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या सोहळ्यासाठी हजारो वारकरी पंढरपूर येथे दाखल झाले आहेत. विठ्ठल प्रासादिक वारकरी मंडळ पुणे, शिवप्रासादीक मंडळ पुणे आणि पंचक्रोशी वारकरी संप्रदाय पुणे यांच्यावतीने आयोजित करण्यात आले आहे.
जाहिरात
या कार्यक्रमाला चिपळूण संगमेश्वरचे आ शेखर निकम याना निमंत्रित करण्यात आले होते. निवृत्ती महाराज मुकनाक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. विठ्ठलावरची भक्ती, प्रेम अन् श्रद्धा जर बघायची असेल तर त्याला इथेच यावे लागेल. रत्नागिरी, सिधुदुर्ग कुठे आणि पंढरपूर कुठे पण केवळ आणि केवळ विठ्ठलभक्तीमुळे आज हजारो वारकरी या ठिकाणी एकत्र आले आहेत. आपल्या वयाचा आणि वयोवृद्ध आहोत याचा विचार न करता तरुणांपासून ते वयोवृद्ध सगळेच वारकरी मला दिसत आहेत असे आ. निकम यांनी सांगून आपण सर्व सर्वसामान्य कष्टकरी आहोत, मी ही तुमच्या कुटूंबातील आहे. मला वारकरी समाजाबद्दल आदर आणि आपुलकी आहे. जशी जमेल तशी सेवा करण्याचा माझा प्रयत्न असतो म्हणूच मी आज या ठिकाणी खास तुमच्यासाठी आलो आहे, असे ते म्हणाले. इथे येताना जर मी येत आहे असे समजले तरी अनेक लोक येतात भेटायला. मला कार्यक्रमाला घरी नेण्याचा आग्रह करतात. कारण येथील अनेकांनी आपल्या संस्थेत शिक्षण घेतले आहे. मात्र आज कोणालाच कल्पना दिली नाही. कारण मलाही तुमच्यासोबत काही काळ विठ्ठल भक्तीत द्यावयाचा होता, असे आ. निकम यांनी सांगितले. निवृत्ती महाराजानी माझ्याजवळ येथील काही समस्यांबाबत खंत व्यक्त केली होती. आपण येथील ट्रस्टचे प्रमुख श्री. शेळखे यांच्यासोबत चर्चा केली आणि यापुढे अशा काही गोष्टी होणार नसल्याचे आश्वासन दिले असल्याचे आ. निकम यांनी सांगून आजची सर्व स्तरातील दिशा आणि दशा बघता आहात. मात्र, आपल्या वारकरी समाजाची एकच दिशा आहे आणि ती कित्येक पिढ्या चालत आली असून यापुढे ती त्याच पद्धतीने अविरत चालत राहणार असल्याचे आ. निकम यांनी सांगितले. आज श्रद्धा, एकनिष्ठाता कुठे राहिल्याचे दिसत नाही. मात्र तुमची श्रद्धा निष्ठा विठ्ठलावरची कधीच ढळली नाही, हीच ताकद पांडुरंगात असल्याचे आ. निकम यांनी सांगून यामुळेच लाखो नव्हे तर करोडो वारकरी शांततेत एकत्र येतात, हे अदभुत आहे. नव्हे तर हा देव पांडुरंगाचा चमत्कार असल्याचे ते म्हणाले. मी आणि मीपणा ज्यावेळी माणसात येतो, त्यावेळी त्याचा अस्त होतो. तुमच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारखे आहेत आणि त्यामध्येच माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा मिळते आहे. तुमच्यासोबत आज राहण्याचे भाग्य मिळाले आणि त्यातून खूप समाधान मिळाले असून वारकरी समाजाला जेवढे शक्य आहे तेवढे आपण यापुढेही सहकार्य करीत राहू, असे आ. निकम यांनी शेवटी स्पष्ट केले.
Comments
Post a Comment