#Satara:23 वर्षानंतर भेटले जुने वर्गमित्र
महादरबार न्यूज नेटवर्क -
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडळी च्या सन १९९९-२००० चा सातवी च्या बॅच चे ३४ विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात सर्वजण तब्बल २३ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले..निमित्त होते स्नेहसंमेलन..१५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडळी येथे ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहून नंतर शाळेतील त्यांच्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
तसेच शाळेला १० खुर्च्या भेट देऊन शाळेच्या ऋणातून मुक्त होण्याचा छोटासा प्रयत्न करण्यात आला..त्यानंतर आपण २३ वर्षांपूर्वी ज्या वर्गात शिकलो त्याच वर्गात बसून रासकर गुरुजी आणि रासकर बाई गिरी गुरुजी, राऊत गुरुजी यांच्याशी गप्पा मारल्या..तसेच सारिका शिंदे , दुर्गा , अर्चना , अॅड गणेश धायगुडे , गणेश ननावरे, सचिन जाधव, सागर जाधव , तुकाराम धायगुडे , किसन खिलारे, संतोष राऊत, सचिन कचरे , राहुल दीक्षित , सागर गावडे त्यानंतर लोणंद या ठिकाणी आयोजित केलेल्या खास कार्यक्रमात सर्वांनी सरस्वती पूजन.एकमेकांचे स्वागत आणि ओळख त्यानंतर गप्पा गोष्टी आणि त्यानंतर स्नेहभोजन,सरांशी विचारविनिमय,पुन्हा भेटण्याचा संकल्प आणि सर्वांचे आभार प्रदर्शन असा हा अनोखा कार्यक्रम पार पडला..
Comments
Post a Comment