#Natepute:गुणवंत विद्यार्थ्यांचा हिवरकर पाटील यांच्याकडून सत्कार


महादरबार न्यूज नेटवर्क -
गोरगरीब लोकांना आरोग्याची सेवा मिळावी म्हणून अहोरात्र झटणारे माळशिरस शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील हे माळशिरस तालुक्यातील गोरगरीब लोकांना आरोग्याची सेवा मिळावी व शासनाने आरोग्याच्या बाबतीत शेवटच्या घटकापर्यंत सुविधा मेळाव्यात यासाठी माळशिरस तालुक्यातील जनतेसाठी
संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,  आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत,  जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते तथा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातसमाजकार्य प्रचंड गतीने चालू आहे त्याचबरोबर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने गेल्या आठवड्यात गवंडी काम करणाऱ्याच्या मुलाचा साहिल झेंडे याचा एमबीबीएस साठी नंबर लागल्याने त्याचा सत्कार करून भविष्यात शैक्षणिक कामासाठी अडचणी आल्यास मी तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे असे सांगून  वैद्यकीय क्षेत्रात राज्यात स्वतःचा लवचिक मिळवला असे डॉक्टर आदित्य संदीप कल्याणी व शैक्षणिक क्षेत्रात  मृण्मयी आनंदकुमार लोंढे हिने दहावी मध्ये ९६.४० एवढे गुण मिळवल्याबद्दल  त्याचबरोबर सिने कलाकार संजय मोहिते यांचा वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत नातेपुते येथील शिवसेना भवनात सत्कार संपन्न केला  समाजातील वेगवेगळ्या घटकांच्या बरोबर शिवसेना आहे असे हिवरकर पाटील यांनी दाखवून दिले .

गुणवंतांचा सत्कार करताना  पळसमंडळ ग्रामपंचायत सदस्य नवनाथ कुंभार , उपसरपंच महेश भोसले ,नतीन कुंभार ,सतीश कुटे, भाजपा नेते तेजस गोरे, नातेपुते शहर प्रमुख पोपट शिंदे, तालुका उपप्रमुख नितीन कोरडकर, कुमार पद्मन संदीप, कल्याणी प्रभाग ६ चे प्रमुख सनी बरडकर, शिवसेना तालुका मीडिया प्रमुख विनायक शिंदे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम