#Natepute:मारकडवाडी येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप


उपसरपंच मारुती रणदिवे व पत्रकार सचिन रणदिवे जिल्हाध्यक्ष माहिती सेवाभावी संस्था यांचा स्तुत्य उपक्रम


महादरबार न्यूज नेटवर्क -
मौजे मारकडवाडी येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप करण्यात आले.समाजामध्ये आपण काहीतरी देणे लागतो या उद्धात हेतूने मारकडवाडी गावचे नुतन उपसरपंच मारुती शंकर रणदिवे व पत्रकार सचिन रणदिवे जिल्हा अध्यक्ष माहिती सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हा परिषद केंद्र शाळा मारकडवाडी, खडकवस्ती,कोडलकर वस्ती,नावडकर वस्ती, या शाळेमध्ये शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी युवा उद्योजक नगरसेवक सचिन (आप्पा) वावरे, बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण (भाऊ) साठे, मारकडवाडी गावचे लोकप्रिय सरपंच पै रणजित मारकड, माजी सरपंच अमित वाघमोडे-पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सपताळे, प्रगतशील बागायतदार सचिन पाटील,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयराम नरळे, खडक वस्ती शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मण मारकड टेलर,ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब मारकड, अरुण वाघमोडे, महादेव भाळे, प्रहार संघटनेचे मारकडवाडी शाखाध्यक्ष दत्तात्रय मारकड, सर्जेराव लोखंडे, प्रताप मारकड, लखन सपताळे, शेखलाल शेख, आनंदा वाघमोडे, मारकडवाडी शाळेचे मुख्याध्यापक मिटकरी सर, राऊत सर,अवघडे सर,लवटे सर, मुंडे सर, भिसे सर, खडक वस्ती शाळेचे मुख्याध्यापक काळे सर,धुमाळ मॅडम,कोडलकर वस्ती येथे माजी उपसरपंच आबाराजे मारकड चेअरमन हनुमंत कोडलकर, कोडलकर वस्तीचे मुख्याध्यापक बालाजी अंकुश बांगर,ज्योती सुरेश मंडलिक सहशिक्षिका व नावडकर वस्ती येथे भीमराव दडस,सोमनाथ दुधाळ, मुख्याध्यापक दुधाळ सर,रोटे सर  यांच्यासह आदी मान्यवर शिक्षक विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत