#Solapur:स्वातंत्र्यसंग्रामातील दुर्मिळ छायाचित्रांचे मल्टिमिडीया प्रदर्शन
केंद्रीय संचार ब्यूरोचा “मेरी माटी मेरा देश” अभियानानिमित विशेष उपक्रम
भारतीय स्वातंत्र्याचे १८५७ ते १९४७ कालखंडातील दुर्मिळ छायाचित्र
विभाजन विभीषिका स्मृती दिवसानिमित्त विशेष श्रद्धांजली कार्यक्रम
पंतप्रधान सोबत एक सेल्फी बुथचे आयोजन
प्रदर्शन तीन दिवस सर्वांसाठी खुले
सोलापूर. दि.१२ – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सांगता कार्यक्रम, मेरी माटी मेरा देश आणि विभाजन विभीषिका स्मृती दिवसानिमित माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर आणि मध्य रेल्वे, सोलापूर विभाग यांच्या वतीने दिनांक १४ ते १६ ऑगस्ट २०२३ या कालावधीमध्ये भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी घडलेल्या घडामोडीवर आणि स्वातंत्र्यसंग्रामातील महत्वपूर्ण घटनांवर तीन दिवसीय डिजिटल मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन सोलापूर रेल्वे स्टेशनमधील जनरल तिकीट खिडकीच्या जवळील जागेत करण्यात आले आहे.
सदर प्रदर्शनमध्ये १८५७ ते १९४७ पर्यतच्या स्वातंत्र्यसंग्रामाची माहिती, सोलापुरातील चार हुतात्मे आणि भारत-पाक फाळणीच्या वेळी घडलेल्या घडामोडी आणि घटनांचे दुर्मिळ छायाचित्रे व मजकूर सहित माहिती असणार आहे. डिजिटल मिडीयाच्या माध्यमातून स्वातंत्र्यसैनिक, ऐतिहासिक स्थळे आणि दुर्मिळ दृश्ये बघता येणार आहे. या प्रदर्शनामध्ये पंतप्रधान सोबत एक सेल्फी याचे विशेष आकर्षण असणार आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन सोलापूरचे खासदार मा.डॉ.जयसिध्देश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते १४ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता करण्यात येणार आहे. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरजकुमार दोहरे, जिल्हाधिकारी, रेल्वे विभागीतील वरिष्ठ अधिकारी आदि उपस्थित राहणार आहेत हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ०९ वाजे पर्यंत सर्वांसाठी विनामुल्य खुले राहणार आहे.
भारतीय स्वातंत्र्यालढ्याबद्दल रेल्वे प्रवासी आणि सामान्य नागरिकांना माहिती व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
जास्तीत जास्त नागरिक, इतिहास अभ्यासक, संशोधक्, स्पर्धा परिक्षाचे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी छायाचित्र प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केंद्रीय संचार ब्युरो, सोलापूर क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण आणि सहायक क्षेत्रीय प्रचार अधीकारी अंबादास यादव यांनी केले आहे.
Comments
Post a Comment