देवरूख येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) दहीहंडी कार्यक्रमात आ. शेखर निकम यांचा सत्कार
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने नियोजन केलं आपणा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा देत असताना या देवरुख शहराचा विकास करणे हेच काम आपल्याला पुढील काळात महायुतीच्या माध्यमातून करायचे आहे आणि आम्ही ते निश्चितच करू, असे प्रतिपादन चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी देवरुख येथे केले.
संगमेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व देवरुख शहर राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यावतीने काल गुरूवारी देवरुख छत्रपती शिवाजी महाराज चौक नजीक उभारण्यात आलेल्या दहीहंडी कार्यक्रमाप्रसंगी आमदार शेखर निकम यांचा सोळजाई देवस्थानचे अध्यक्ष बापू गांधी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. देवरुख शहराच्या विकासाकरिता आमदार शेखर निकम यांनी चार कोटी मंजूर केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस तालुक्याच्या वतीने आमदार श्री. निकम यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या सत्कारला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपा बरोबरच अन्य पक्षाचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. कार्यक्रमात प्रारंभी चिपळूणच्या माजी सभापती पूजा निकम यांच्याहस्ते मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संदेश शेट्ये, राष्ट्रवादीचे तालुका संघटक बाळू ढवळे, आरडीसीसी बँकेच्या संचालिका नेहा माने, युवक तालुकाध्यक्ष पंकज पुसाळकर, माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड, प्रताप सावंत, मोहन वनकर, नितीन भोसले, हुसेन बोबडे, राजू वणकुद्रे, महिला तालुकाध्यक्ष दुर्वा वेल्हाळ, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, विनोद म्हस्के, रुपेश कदम, मिथुन निकम, अभिजीत शेट्ये, माजी जिल्हा परिषद सदस्य मुग्धा जागुष्टे यांसह अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व अन्य पक्षांचे कार्यकर्ते महिला उपस्थित होत्या. यावेळी अनेक गोविंदा पथकांनी थरावर थर लावत सलामी देऊन हजारो रुपयांची बक्षीसे पटकावली. यावेळी सुंदर नृत्यविष्कार सादर करण्यात आला. या नृत्यावर अनेकांनी ठेका धरला.
0 Comments