#Varvand:वाढदिवसाचे औचित्य साधून स्पर्धा चे आयोजन


महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर
दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष
मा.सौ.योगिनीताई दिवेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.
दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष, स्वयंसिद्धा फाउंडेशन आणि चंद्रभागा महिला पथसंस्था केडगाव याच्या संस्थापक अध्यक्षा मा.सौ.योगिनीताई दिवेकर यांच्या वाढदिवसानिमित्त "RUN FOR WOMEN'S HEALTH"."एक धाव स्त्री शक्तीसाठी"  भव्य मॅरेथॉन स्पर्धा व "चला स्वतः सोबत निसर्गाची पण काळजी करूया" या उद्देशास अनुसरून बुधवार(दि६रोजी) मॅरेथॉन-2023  स्पर्धेचे व “वृक्षारोपण” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


सदर “मॅरेथॉन-२०२३ या स्पर्धेमध्ये ५०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धा तीन किलोमीटर मॅरेथॉन धावणे व पाच किलोमीटर मॅरेथॉन धावणे अशा दोन गटांमध्ये विभागल्या होत्या
पाच किलोमीटर धावणे मॅरेथॉन मुले
१) मखरे सुशांत मनोहर -  प्रथम क्रमांक
२) करे गणेश सोपान -   द्वितीय क्रमांक
3) शिंगटे ओंकार शिवाजी -   तृतीय क्रमांक 
४) लोखंडे प्रणव गोपीनाथ -   उत्तेजनार्थ पहिला  
५) केसकर मारुती नामदेव -   उत्तेजनार्थ दुसरा   
पाच किलोमीटर धावणे मॅरेथॉन मुली
१) मातने सुरेखा रामा  -  प्रथम क्रमांक
२) बारवकर पूजा नंदकुमार -   द्वितीय क्रमांक
३) भोसले श्रावणी महादेव -   तृतीय क्रमांक 
४) जगताप स्वप्ना संतोष -   उत्तेजनार्थ पहिला  
५) शितोळे अर्पिता संतोष -   उत्तेजनार्थ दुसरा   
तीन किलोमीटर धावणे मॅरेथॉन मुले
१) शेख अलीम जावेद  -  प्रथम क्रमांक
२) कोंडे ऋषिकेश शेखर -   द्वितीय क्रमांक
३) काळे ऋतिक दादा -   तृतीय क्रमांक 
४) येडे करण सोमनाथ -   उत्तेजनार्थ पहिला  
५) गोंधळी अभिषेक विश्वनाथ -   उत्तेजनार्थ दुसरा   
तीन किलोमीटर धावणे मॅरेथॉन मुली
१) हिरडे अश्विनी नवनाथ -   प्रथम क्रमांक
२) शेलार ज्ञानेश्वरी भाऊसाहेब -   द्वितीय क्रमांक
३) कारंडे अमृता अशोक -   तृतीय क्रमांक 
४) गुरव सिद्धी दत्तात्रेय -   उत्तेजनार्थ पहिला  
५) शिंदे आकांक्षा सखाराम -   उत्तेजनार्थ दुसरा  
अतिशय चुरशीच्या झालेल्या या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये अद्वैत केशव वाबळे हा चार वर्षाचा एक छोटा चिमुकला देखील पूर्ण मॅरेथॉन धावला व त्याने तीन किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण केली. त्याचबरोबर सदर स्पर्धेमध्ये पोलीस इन्स्पेक्टर आदरणीय वाबळे साहेब यांनी देखील सदर मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केली. याचबरोबर पाटस येथील गृहिणी सोनाली हर्षद बंदिष्टी व पुनम विठ्ठल बंदिष्टी यांनी देखील सदर मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केली या स्पर्धेनंतर “चला स्वतः सोबत निसर्गाचा पण विकास करूया” या ऊक्ती करिता गोपीनाथ मंदिराच्या परिसरामध्ये ५०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमास दौंड तालुक्यातील व पंचक्रोशीतील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती यामध्ये प्रामुख्याने वरवंड ग्राम शिक्षण संस्थेचे सन्माननीय संचालक डॉ. विजयराव दिवेकर, एकनाथ सिताराम दिवेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुनील निगडे उपप्राचार्य डॉ शरद गाडेकर, ए. सी. दिवेकर फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अमिता डोंगरे, गोपीनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग शिवा व्हॅली शाळेच्या प्राचार्या डॉक्टर किरण सिंग मॅडम डॉक्टर अवचट डॉक्टर विनया इंगळे डॉक्टर शरद इंगळे डॉक्टर दाते डॉक्टर अवचर कॅप्टन जिमचे प्रमुख व त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होते.


आदरणीय योगिनी योगिनीताई दिवेकर यांनी पर्यावरण संतुलनाकरिता व पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याकरता गेले पाच-सहा वर्षापासून दरवर्षी शेकडो झाडांचे वृक्षारोपण केलेले आहे त्यांच्या मनोगतात बोलत असताना योगिनीताई यांनी सध्या संपूर्ण जगासमोर असलेली प्रमुख समस्या म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास कसा रोखला पाहिजे आणि हे पर्यावरणाचे संतुलन साधण्यासाठी केवळ एकट्याने काम करून शक्य होणार नाही ज्यावेळी सर्व लोकांचा लोकसहभाग वाढेल त्याच वेळी आपण हे पर्यावरण अतिशय योग्य रीतीने संतुलित करण्यास हातभार लावू शकतो व येणाऱ्या पिढीला एक योग्य व संतुलित पर्यावरण हस्तांतरित करू शकतो त्यासाठी प्रत्येकाने पर्यावरण वाचवण्यासाठी या चळवळीमध्ये लोकसहभाग घेणे अतिशय गरजेचे आहे व प्रत्येकाच्या मनामध्ये पर्यावरणाविषयी जाणीव जागृती निर्माण व्हावी असे आवाहन केले दिवसेंदिवस निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती कमी होत चाललेले पावसाचे प्रमाण यावर पर्यावरण वाचविणे हाच एकमेव उपाय आहे म्हणून प्रत्येकाने यामध्ये सहभाग घ्यावा असे त्यांनी मनोगत व्यक्त केले व उपस्थितांना मार्गदर्शन केले
सदर स्पर्धा योग्य व अचूक नियोजनात पार पाडण्याकरता पुण्यावरून आलेले पंच डॉ रोहित तांबे सर हे होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण आढाव सर यांनी केले तर कार्यक्रमा चे योग्य अचूक नियोजन शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख शारीरिक शिक्षण संचालक कॅप्टन डॉ. मंगेश पालवे सर, डॉ. राजेश सुरवसे, सर्व एनसीसी कॅडेट्स व एन एस एस चे स्वयंसेवक कार्यक्रमाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत