#Mumbai:ग्लोबल विनर्स यांचेमार्फत सामाजिक उपक्रमांर्तगत सहाय्य
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
गुरुवर्य शशिकांत खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली (विनर्स आध्यात्मिक व्यवसाय प्रशिक्षक) तसेच सुप्रिम साकार मिशन व ग्लोबल विनर्स यांच्या संयुक्त विद्यमाने टिटवाळा येथील पारस बालभवन या आश्रम शाळेत भेट देण्यात आली होती. सदर आश्रमशाळेच्या आवश्यकता व मागणीनुसार त्यांचेकडील अन्नसाठयाकरिता डिप फ्रिजर उपलब्ध करुन देण्यात आला. या कार्यक्रमास सुप्रसिध्द अभिनेते रणजीत जोग यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दिप प्रजवलन करुन भारतमातेच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर भारतमातेच्या आरतीचे महत्त्व विशद करुन सामुहिक आरती घेण्यात आली. तदनंतर सुप्रिम साकार मिशनचे संस्थापक श्री. घनश्याम शर्मा यांनी विनर्स एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक गुरुवर्य श्री. शशिकांत खामकर यांच्या कार्याबाबत माहिती विशद केली. त्यानंतर ग्लोबल विनर्स परिवारातील काही सदस्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
तदनंतर शाळेचे संस्थापक श्री व सौ गुंजाळ यांना तसेच उपस्थित मान्यवर श्री. रणजीत जोग यांना ध्वजांकित स्कोल देवून स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रमात विनर्स परिवारामार्फत एकूण उद्देश व राबविण्यात येणार्या जॉय ऑफ गिव्हींग सारख्या कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. मंगेश बांद्रे व श्रीम. राजश्री पाटील यांनी केले होते. विनर्स परिवारामार्फत श्री. आण्णा पाटील, भार्गवी झोरे, राजश्री पाटील, पार्थ रणदिवे, सुर्या रणदिवे, मंगेश बांद्रे, अशोक पै, साई कुळे, प्रफुल्ल पाटील, सार्थक बांद्रे, विनायक मसुरकर, घनश्याम शर्मा, अमेय डांगे, प्रसाद, शुभम बैकर , किरण खोत या सर्वांनी एकत्रितपणे कार्यक्रम यशस्वी केला.
Comments
Post a Comment