#Natepute:नातेपुते नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्यावर शिस्त भंगाची कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन द्वारे मागणी
महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्यावर शिस्त भंगाची कारवाई होणे बाबत शिवसेना माळशिरस तालुक्याचे प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांच्याकडून शिंदे गट शिवसेनेकडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्यावर शिस्त भंगाची कारवाई करवी नातेपुते नगरपंचायतीला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी शिवसेना माळशिरस तालुका प्रमुख यांच्या मागणीनुसार २ कोटी ९० लाख रुपयांचा निधी स्टेट लाईटसाठी मंजूर केलेला आहे.
परंतु नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व पदाधिकारी यांनी प्रोटोकॉल प्रमाणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व दुसरे उपमुख्यमंत्री यांचा फोटो न लावता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा अपमान केलेला आहे ही वृत्ती अतिशय खेदजनक आहे अशी वृत्ती वेळीच न ठेचल्यास भविष्यात राज्यात असाच पायंडा पडेल अशी भीती आहे त्यावर शिस्तभंगाची कारवाई म्हणून नातेपुते नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांना गडचिरोली येथे बदली करावे.
अशी मागणी तमाम शिवसैनिक व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समर्थकांमध्ये जोरदार चर्चा चालू आहे आणि समाजातील सर्व स्तरामधून कारवाईची अपेक्षा आहे अशा प्रकारची निवेदन माळशिरस तालुका शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी दिले आहे
Comments
Post a Comment