#Chiplun:सरंद ग्रामदैवत नवरात्रोत्सव घटस्थापना सोहळा उत्साहात प्रारंभ
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
संपूर्ण महाराष्ट्रात हिंदुसंस्कृती परंपरेनुसार शारदीय नवरात्रोत्सव, घटस्थापना सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील संरद ग्रामदैवत श्री वाघजाई देवी,श्री पावनाई देवी,श्री नवलाई देवी,श्री चंडकाई देवी, आणि श्री केदार देव या देव- देवींची अलंकार परिधान करून प्राचीन परंपरेनुसार गाव घरामध्ये घटस्थापना करण्यात येत असते.
हा नवरात्रोत्सव सोहळा दि. १५ ते २४ ऑक्टोबर पर्यंत समस्त गावकरी यांच्या भक्तिभावाने आनंदाने साजरा करण्यात येतो. या नवरात्र उत्सवात दररोज सायंकाळी ७ वाजता महाआरती सह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तसेच आलेल्या सर्व भाविकांना प्रत्येकी गाव-वाडीमार्फत राञी चहा व नाष्टा ची व्यवस्था केली जाते.पाचव्या व सातव्या माळेला कोकणातील प्रसिद्ध असे लोक कलाकृतीचे सादरीकरण होत असते. या संपूर्ण काळात गावातील ग्रामस्थ, तरुण- तरूणी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
Comments
Post a Comment