#Natepute:नातेपुते ग्रामीण रुग्णालय येथे शंभर खाटांचे महिला हॉस्पिटल मंजूर

राजकुमार हिवरकर पाटील यांच्या मागणीला यश


महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते हे गाव सातारा पुणे सोलापूर जिल्ह्याच्या बॉर्डरवर असल्याने तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सोलापूर जिल्हा आगमनाच्या पहिल्या मुक्कामाचे ठिकाण आहे नातेपुते गावाच्या आजूबाजूला शंभर ते दीडशे किलोमीटरवर कुठेही महिला हॉस्पिटल नाही त्यामुळे महिलांचे होणारे हाल होतात.माढा येथे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत माळशिरस तालुक्यात नातेपुते या ठिकाणी महिलांसाठी शंभर खाटांचे हॉस्पिटल व्हावे यासाठी चर्चा होऊन शिवाजीराव सावंत यांनी आरोग्यमंत्र्यांशी बोलणे करून मंजुरी देण्याबाबत कळविले होते.


नातेपुते ग्रामीण रुग्णालयात १०० खटांचे महिला हॉस्पिटल मंजूर करावे यासाठी राजकुमार हिवरकर पाटील यांनी थेट आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे मागणी केली आरोग्यमंत्री तानाजी सावंतसाहेब यांनी तात्काळ मंजुरी देऊन आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ राधाकिसन पवार आरोग्य सेवा पुणे मंडळ यांनी त्याच दिवशी मंजुरी बाबतचे पत्र सोलापूर जिल्हा शल्यशिक्षक डॉ.धनंजय पाटील यांना तात्काळ पत्राद्वारे कळविले आहे.


या मंजुरी देतेवेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत माळशिरस तालुका शिवसेनाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील, स्वीय सहाय्यक रवींद्र अनभुले, रवी जाधव, टकले उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत