#Yavat:नवरात्र उत्सवामुळे यवतमधील वातावरण भक्तीमय झाले
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दौंड तालुक्यातील यवत येथील नवरात्र उत्सवची सुरवात अश्विन शुद्ध १ला झाली त्याच दिवशी दि १५ ला घटस्थापनाला झाली. त्या दिवसापासून यवत येथील वातावरण भक्तीमय मंगलमय झालेले आहे. यवत येथील महालक्ष्मीमाता मंदिर सर्व जुने आहे नवसाला पावणारी देवी म्हणून तिचं नाव लौकिक आहे बऱ्याच दूरवरून लोक महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी यवत येथे येतात पुणे ,मुंबई, कोकण सोलापूर नगर जिल्ह्यातील भाविक ,दर्शनासाठी येत असतात. महालक्ष्मी मंदिरात घटस्थापने नंतर पंचमीला देवीची गावातून मिरवणूक होते यवत चे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदीरात नवरात्र उत्सवा दरम्यान आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांनी मंदीर सजविले जाते. महालक्ष्मी नगर मध्ये महालक्ष्मी मातेचे मंदिर आहे तेथेही आकर्षक विद्युत रोषनाई केली जाते. श्री तूकाई देवी तिथे नवरात्र उत्सव साजरा करतात आसरा मित्र मंडळातर्फे नवरात्र उत्सव साजरा करतात यवत येथील श्री काळुबाई माता मंदिर येथे सुद्धा नवरात्र साजरी केले जाते. यवत येथील तुळजाभवानी मंदिर यवत येथील गावातच आहे तुळजाभवानीचे मंदिर जवळपास कुठे नसल्याने भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. नवसाला पावणारी देवी म्हणून ओळख आहे आज सातवी माळ असल्यामुळे तुळजाभवानी मंदिरात गर्दी होती आकर्षक रोषनाई व देवीची गाणी येथे लावली जातात .
Comments
Post a Comment