#Malshiras:उत्तमराव जानकर साहेब यांनी कारूंडे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, सदस्य यांचा केला सन्मान


महादरबार न्यूज नेटवर्क -
वेळापूर (ता.माळशिरस ) ०७ नोव्हेंबर २०२३... गरुड बंगला वेळापूर या ठिकाणी, कारुंडे ता. माळशिरस, ग्रामपंचायत निवडणूकीत, तालुक्याच्या जनतेचे आमदार, लोकनेते श्री. उत्तमराव जानकर साहेब (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज) यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ ग्रामविकास पॅनलने, सरपंच पदासह ०८-०३ ने  विजय मिळवला.


यावेळी नूतन सरपंच सौ. नंदा कैलास नामदास यांचा सन्मान श्री.उत्तमराव जानकर साहेब यांच्या स्नुषा डॉ. स्नेहलताई जीवन जानकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला, तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या सौ.रेश्मा मोहन रुपनवर,सौ. सुनिता संजय पवार, सौ. सीमा संतोष वाघमोडे, सौ. कल्पना लक्ष्मण करचे, सौ. हर्षाली गणेश गायकवाड यांचाही सन्मान करण्यात आला.


नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य श्री. सूर्यकांत विठ्ठल पाटील, श्री. सचिन भास्कर शिंदे, श्री. महेश दिलीप थिटे यांचा सन्मान श्री. उत्तमराव जानकर साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
     
यावेळी भैरवनाथ ग्रामविकास पॅनलप्रमुख मा. सरपंच श्री.हनुमंत पाटील, श्री सुभाष पाटील मा. चेअरमन ,युवा नेते श्री. तुषार पाटील, श्री. मोहन रुपनवर (सोसायटी चेअरमन), श्री.तानाजी पाटील (मा. चेअरमन), श्री सुभाष पाटील (मा.ग्रामपंचायत सदस्य), श्री.दत्तू गोसावी, एस.एम.गायकवाड(आरपीआय आठवले ज्येष्ठ नेते), भारत नामदार, संजय पवार ,लाला रानगट, गणेश गायकवाड, संतोष वाघमोडे ,अमोल गायकवाड, सुरज थिटे, आबा पवार,ज्ञानेश्वर खिलारे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम