#Malshiras:पिलीव येथे दुध दर वाढीसाठी सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन ,शेतकरी जनावरासह रस्त्यावर

        
 महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस
माळशिरस तालुक्यातील  पिलीव येथे  पिलीव  परीसरातील  शेतकऱ्यांनी दुध दर वाढीसाठी  जनावरे रस्त्यावर  बांधुन  रस्ता  रोको आंदोलन केले.शासनाने  दुधाला  प्रतिलीटर  ३४ रुपये  एवढा  दर ठरवुन देऊनही सोलापूर  जिल्हयातील खाजगी  दुध संघ २५ ते २६ रुपये  एवढा दर देत शेतकऱ्यांना  लुटणयाचे काम  करीत आहेत  शासनाने  ताबडतोब  अश्या  दुध संघावर  कारवाई  करावी व शेतकऱ्यांना ४० रुपये  एवढा दर दयावा ,पशुखादयाचे  दर कमी करावेत,औषधावरील जिएसटी कमी करावा या प्रमुख  मागणयासाठी पिलीव येथे  पिलीव  परीसरातील सर्वपक्षीय नेते ,शेतकरी  बांधवांनी रस्ता  रोको केला . यावेळी  शेतकरी  बांधव मोठ्या  संख्येने उपस्थित होते.


यावेळी  शेतकऱ्यांना  सागर भैस,सचिन  भैस,निशांत बगाडे,शिवराज पुकळे, राहुल मदने,विजय पिसे,राजेंद्र  जामदार, जिवन गोरे,अजय खुर्द, स्वाभीमानी शेतकरी  संघटनेचे  तालुकाध्यक्ष  अजित बोरकर, आरिफखान पठाण  ,अशोक बगाडे यांनी  उपस्थित  शेतकऱ्यांना  मार्गदर्शन  करीत शासनाने  ताबडतोब  खाजगी दुध  संघाची मनमानी  थांबवित दुधाला  चांगला  दर दयावी अशी  मागणी  यावेळी मान्यवरांनी केली.

सदरच्या  आंदोलनाप्रसंगी शयामतात्या मदने, कुसमोडचे सरपंच  महावीर धायगुडे, तुषार लवटे, कल्याण  जावळे, उत्तम करांडे,आनंद पाटील,  राहुल  भैस, शंकर  बगाडे,लक्ष्मण वगरे,नबाजी मदने,शहाजी लेंगरे, सागर शेंडगे, शिंगोर्णीचे सरपंच  अक्षय धांडोरे, बचेरीचे सरपंच  विश्वजीत गोरड,जितेंद्र पाटील, डॉकटर  निलेश कांबळे  ,कुमार  भैस,संतोष  पडळकर, लहु पाटील, यांच्या सह पिलीव, झिंजेवस्ती, कुसमोड, काळमवाडी, सुळेवाडी, बचेरी,शिंगोर्णी  परीसरातील  शेतकरी  बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरच्या  मागणीचे निवेदन  पोलीस  उपनिरीक्षक  एम एम पुजारी  यांनी स्विकारले. या रस्ता  रोको  वेळी पिलीव  पोलीस स्टेशनचे हवालदार पंडीत मिसाळ, सतीश धुमाळ, दत्ता  खरात ,अमित  जाधव  यांनी चोख पोलीस  बंदोबस्त  ठेवला  होता.  

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम