महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दौंड तालुक्यातील यवत येथे सर्वत्र दत्त जयंती साजरी करण्यात आला.यवत व परिसरात सर्वच ठिकाणी दत्त जयंतीचा उत्सव उत्साहत साजरा करण्यात आला काही ठिकाणी उंबर वृक्षाची पूजा करून दत्त जयंतीचा उत्सव करण्यात आला. सकाळी पूजा करण्यात आली व नंतर अभिषेक करण्यात आला . यवत येथील मुख्य दत्त महाराजांच्या मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली व फुलांची सजावट केली होती या दत्त मंदिरात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. पोलीस स्टेशन, कुदळे वस्ती कदम आळी ठिकाणी दत्तजयंती साजरी करण्यात आली. दत्तजयंती उत्सव सर्वत्र सादर करण्यात आला सर्व ठिकाणी दत्त मंदिरा वर आकर्षक विद्युत रोषणाई केली होती . संध्याकाळी महाप्रसादाचे कार्यक्रम सर्व ठिकाणी करण्यात आले होते. दोरगे वस्ती येथे किसन राऊत यांनी सुद्धा दत्तजयंतीचा कार्यक्रम उत्साहत साजरा केला. सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करून सर्व भाविकांना प्रसाद देण्यात आला. दत्त जयंतीच्या निमित्ताने लोकांनी ठिकठिकाणी यवत मध्ये विविध परिसरात दत्त जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
0 Comments