#Varvand:दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांचे मजबूत जाळे यामुळे निर्माण होणार
महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर
दौंड तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्यांची सुधरणा करण्यासाठी सुमारे ८० कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याची माहिती दौंड तालुक्याचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी दिली आहे.
दौंड तालुक्यातील शेतकरी बांधवांना आपला शेतमाल बाजारपेठे पर्यंत पोहोचविण्यासाठी दर्जेदार रस्ते मिळावेत, नागरिकांचे दळणवळण सोयीस्कर व्हावे या उद्देशाने दौंड तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्याच्या कामासाठी निधी मिळवा अशी मागणी आमदार अॅड. राहुल कुल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचेकडे केली होती, त्यानुसार दौंड तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्यांच्या कामासाठी डिसेंबर च्या पुरवणी अर्थसंकल्पात सुमारे ८० कोटी रुपयांचा भरघोस निधी मिळाला असून, दौंड तालुक्यातील प्रत्येक घटकांचा विकास करण्यासाठी यापुढील काळात देखील प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी यावेळी सांगीतले.
दौंड तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्याच्या कामासाठी मिळालेला निधीची माहिती पुढील प्रमाणे
खडकी ते दौंड तालुका हद्द रस्ता, देऊळगावराजे ते पेडगाव रस्ता, मलठण हनुमानवाडी ते भिगवण, राशिन रस्ता व काळेवाडी (प्रजिमा - ८१) ते प्रजिमा - ८० ते भापकरवस्ती रस्ता सुधारणा करणे - २० कोटी,बोरीबेल ते देऊळगाव राजे व दौंड ते लिंगाळी ते मळद रस्ता सुधारणा करणे - २० कोटी,राहु ते टेळेवाडी चौक पर्यंत रस्त्याची सुधारणा करणे - २ कोटी ५० लाख,स्वामी चिचोंली ते राजेगाव ते नायगाव रस्त्याची सुधारणा करणे - २कोटी ,
बोरीऐंदी ताम्हणवाडी ते तालुका हद्द रस्त्याची सुधारणा करणे - २ कोटी ५० लाख,सोलापुर हायवे ते फरगडेवस्ती माळवाडी रस्त्याची सुधारणा करणे - ३ कोटी ,पाटेठाण ते टेळेवाडी चौक रस्त्याची सुधारणा करणे - ३ कोटी,रेल्वे गेट ते हातवळण रस्त्याची सुधारणा करणे - ४ कोटी,पुणे सोलापुर हायवे ते स्वामी चिचोंली ते राजेगाव नायगाव रस्ता सुधारणा करणे - २० कोटी,
खुटबाव ऐकेरीवडी देलवडी रस्त्याची सुधारणा करणे - ३ कोटी
डिसेंबर च्या पुरवणी अर्थसंकल्पात मिळालेल्या या भरघोस निधीमुळे दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांचे मजबूत रस्त्यांचे जाळे यामुळे निर्माण होणार असल्याने शेतकरी व नागरिकांनी आमदार अॅड. कुल यांचे आभार मानले आहेत.
खुटबाव ऐकेरीवडी देलवडी रस्त्याची सुधारणा करणे - ३ कोटी
डिसेंबर च्या पुरवणी अर्थसंकल्पात मिळालेल्या या भरघोस निधीमुळे दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांचे मजबूत रस्त्यांचे जाळे यामुळे निर्माण होणार असल्याने शेतकरी व नागरिकांनी आमदार अॅड. कुल यांचे आभार मानले आहेत.
Comments
Post a Comment