महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप पुणे सोलापूर महामार्ग वरील यवत येथील प्राथमिक शाळा व इरिकेशन कॉलनीच्या मधून येणाऱ्या रस्ता पुणे सोलापूर सर्विस रोडला येतो . शाळेच्याजवळ येणाऱ्या रस्त्याला उतार खूप आहे तोच उतार पुणे सोलापूर रोड च्या सर्व्हीस ला येऊन मिळतो.या सर्व्हीस रस्त्यावर वर्दळ सारखी चालू असते.
या सर्विस रोडवर अपघात होऊ शकतोय जवळ प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा आहे विद्यार्थी ची वर्दळ असते प्राथमिक शाळा व एरीकेशन कॉलनीच्या मध्ये एक रायकर मळा येथून येणारा रस्ता पुणे सोलापूर महामार्गावरील सर्विस रस्त्याला येत आहे परंतु या रस्त्याला उतार खूपच असल्याने दोन्ही बाजूने घरे व शाळा असल्यामुळे या रस्त्याने येणाऱ्या व्यक्तीला कोणते वाहन कुठून येते हे समजत नाही .तेथे उतार जास्त असल्याने येथे अपघात होण्याची शक्यता आहे सोलापूर रस्त्यावरील सर्विस रस्त्यावर डिव्हायडर होणे करावा असे नागरिकां कडून मागणी होत . ग्रामपंचायत ने त्यांच्या रस्त्याच्या हद्दीत डांबरीकरण करावे असे नागरिकांचे मत आहे.
याबाबत पाटस टोल अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले लवकरच सर्विस रस्त्याला डिव्हायडर टाकून हे समस्या सोडवणार आहोत.
0 Comments