#Yavat:आयुष्यमान भारत कार्ड शिबिरात कासुर्डीत २७५ ग्रामस्थांचा सहभाग


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज कासुर्डी गावात विठ्ठल मंदिरात आयुष्यमान भारत कार्डचे शिबीर घेण्यात आले. यामध्ये कासुर्डी गाव,वाडी वस्ती सह 275 ग्रामस्थांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रशांत वांढेकर, दौंड तालुका संपर्कप्रमुख गणेश दिवेकर दौंड तालुका युवक उपाध्यक्ष प्रशांत ताडगे, आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे आयोजन तंटामुक्ती अध्यक्ष मा.सरपंच पांडुरंग आखाडे, मराठा महासंघ जिल्हा युवकअध्यक्ष मयूर सोळसकर,दौंड तालुका उपाध्यक्ष संतोष पोपट आखाडे, तालुका विद्यार्थी सचिव सुरज वसंत आखाडे,दौंड तालुका संपर्कप्रमुख चंद्रकांत आखाडे, दौंड तालुका व्यापार उद्योग आघाडी कार्याध्यक्ष अमोल चौंडकर यांनी केले होते.

सदर कार्यक्रमाला कासुर्डी गावचे ग्रामपंचायतचे सरपंच,उपसरपंच व  सदस्य, कासुर्डी विकास सोसायटीचे चेअरमन,व्हाईस चेअरमन, संचालक आणि गावातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.  आयुष्यमान भारत योजना म्हणजे सामान्य जनतेचे आरोग्य कवच....
आपल्या कुटुंबातील कुणी आजारी पडले तर त्याचा आर्थिक ताण संपूर्ण कुटुंबावर येतो, काही वेळा डोक्यावर कर्ज उभं राहत,या दृष्टचक्रातून सामान्य जनतेला जायची वेळ येऊ नये म्हणून भारत सरकारने आयुष्यमान भारत योजना सुरु केली आहे. यामुळे प्रत्येक कुटुंबाला आजारपणात ५ लाख रुपयांचे अर्थ साहाय्य मिळते, हि योजना म्हणजे सामान्य जनतेचे आरोग्य कवच आहे.अशी माहिती यावेळी मयूर सोळसकर यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत