#Malshiras:मुलांना शालेय जीवनात शिक्षणाबरोबर व्यवहारिक ज्ञान मिळणे ही आवश्यक - समाधान मिसाळ
महादरबार न्यूज नेटवर्क -
सोलापूर जिल्ह्यातील आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त, मेडद येथील जि. प. प्राथ. शाळा, तुपेवस्ती येथे "ऑनलाईन ऑफलाईन बँकिंग व्यवहार" या विषयावर पत्रकार व सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी क्लार्क मा. श्री. समाधान मिसाळ यांनी विद्यार्थ्यांसोबत परिसंवाद साधला.
यावेळी त्यांनी शालेय जीवनातच मुलांना व्यवहारिक तसेच पैशाचे व्यवस्थापन, पैशाची बचत करणे, अनावश्यक खर्च टाळणे, बचत खाते, चालू खाते, पैसे पाठविणे, पैसे काढणे, RTGS /NEFT द्वारे इतर बँकेशी व्यवहार कसे करावे यासंदर्भात बहुमोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी देखील त्यास चांगला प्रतिसाद दिला. यावेळी बोलताना श्री, समाधान मिसाळ सर म्हणाले की, हा अतिशय स्तुत्य उपक्रम शाळेने राबविला आहे. मुलांना याच वयात जर शालेय जीवनाबरोबर व्यावहारिक ज्ञान मिळाले तर भविष्यात त्यांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. तसेच आपल्या शाळेस भेट देऊन खरंच मन खूप भारावून गेलं. बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. पुन्हा बालपण यावं असं वाटलं. खरंच आपली शाळा खूप सुंदर आहे. मुले देखील खूपच हुशार आहेत. मुलांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या. यापुढे कधीही आपल्या शाळेत कोणत्याही कार्यक्रमास उपस्थित राहण्याची संधी मिळाल्यास नक्कीच येऊ असे आश्वासन ही दिले.
यावेळी शाळेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
या परिसंवाद कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम, सर्व शिक्षक स्टाफ व बाल विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment