#Yavat:राष्ट्रीय अन्न सुरक्षाअभियानांतर्गत यवत येथे शेती दिन साजरा
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने रब्बी हंगाम सन मध्ये यवत येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत ज्वारी सन् २०२३:२४ शेती दिन शेतकरी मल्हारी तात्याबा दोरगे व लहू देवराम दोरगे यांच्या शेतामध्ये आयोजित करण्यात आला होता. या ज्वारी प्रकल्पामध्ये यवत गावाची निवड करून शेतकऱ्यांना पिकाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करून निविष्ठांचे वाटप करण्यात आले होते. मंडळ कृषी अधिकारी स्वप्नील बनकर व कृषी पर्यवेक्षक मनोज मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना पेरणीपासून ते काढणीपर्यंत पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल याविषयी कृषी सहाय्यक अधिकारी विनायक जगताप यांच्या नियोजनाखाली पिक प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकरी कुलदीप दोरगे यांनी सांगितले की आमचे ज्वारीचे पीक खुप चांगले असुन नेहमीच्या पद्धतीपेक्षा आम्हाला ३०ते ४० टक्के उत्पादनामध्ये वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला.
यावेळी कृषी पर्यवेक्षक मनोज मिसाळ, कृषी सहाय्यक विनायक जगताप, श्रीनाथ शेतकरी गटाचे अध्यक्ष तात्याबा दोरगे, प्रयोगशील शेतकरी गणेश कोळपे, मा.चेअरमन राजेंद्र दोरगे, मा.ग्रा सदस्य भगवान दोरगे, काशिनाथ दोरगे, लहू दोरगे, दिगंबर दोरगे, सिद्धार्थ भालेराव, दौलत दोरगे, सौ.आशाबाई दोरगे, सौसुवर्णा भालेराव, चिमाजी चोरमले, संदीप भालेराव, तुषार दोरगे व रिसोर्स फार्मर युवराज जगताप यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनी कृषी विभागाने राबवलेल्या प्रकल्पाबद्दल कृषी विभागाचे आभार मानून समाधान व्यक्त केले.
Comments
Post a Comment