#Yavat:यवत येथील ग्रामसभा कोरम अभावी रद्द


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
यवत येथील ग्रामसभा कोरम अभावी रद्द करण्याची वेळ पंचायत वर आली दि  (२६ जाने) ला  होत असलेल्या ग्रामसभेचे सकाळी ११ वाजता श्री काळभैरवनाथ मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते परंतु सकाळी ११.३० सुमारास   कोरम अभावी ही ग्रामसभा रद्द केल्याचे  सांगितले २६ जाने ग्रामसभा असून देखील जिल्हा परिषद शाळेचे, मुख्याध्यापक रामभाऊ दोरगे व मुख्याध्यापक शिंदे यांसह या ग्रामसभेसाठी सरपंच समीर दोरगे, ग्रामपंचायत सदस्य नाथदेव दोरगे व  खुटवड वगळता इतर सर्व सदस्यांनी व सर्वच शासकीय विभागांनी ग्रामसभेकडे पाठ फिरवली. यावेळी भांडगाव ग्रामपंचायतचा पदभार असल्याने यवत ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी कदम हे देखील अनुपस्थित होते , १९  ते २० हजार  लोकसंख्या असलेल्या यवत येथील ग्रामसभेसाठी फक्त १५ च्या आसपास नागरिकच उपस्थित होते. याबाबत प्रशासनाने कडक नियम करून  नागरिक ग्रामसभेसाठी  उपस्थित राहतील असे प्रयत्न करावे .

कोरम अभावी दानोळीत ग्रामसभा तहकूबदानोळी, ता. २६ येथे आज बोलावलेली ग्रामसभा कोरम अभावी तहकूब केली. नुकताच जलजीवन पाणीपुरवठा योजनेचा प्रारंभ केला आहे. गायरान अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. ग्रामसभेत या विषयांवर चर्चा होणे आवश्यक असताना ग्रामस्थांनी मात्र ग्रामसभेकडे पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. कोरम अभावी ग्रामसभा तहकूब करण्यात येत असल्याची माहिती ग्रामसेवक आर. के. बागुल यांनी दिली.यावेळी प्रारंभी महिला सभेचे आयोजन केले होते. यामध्ये प्रामुख्याने अंगणवाडीची झालेली दुरवस्था, नवीन बचत गटांची स्थापना करणे, जुने बचत गट सुरू करणे, बचत गटामार्फत पोषण आहार सुरु करणे याबाबत चर्चा केली. काही अंगणवाड्यांमध्ये शौचालय, फरशी, खिडक्या इत्यादी सुविधांचा अभाव असल्याने दुरुस्ती करावी, अशी मागणी केली. याची दखल घेत अंगणवाड्यांमध्ये तत्काळ दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामसेवक यांनी दिली. महिला सबलीकरणासह विविध विषयांवर चर्चा केली.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम