#Natepute:हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती माळशिरस तालुक्याच्या पश्चिम विभागात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली


महादरबार न्यूज नेटवर्क -
शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख श्री अनिल कोकीळ साहेब, शिवसेना उपनेत्या सौ अस्मिताताई गायकवाड, शिवसेना प्रवक्ते प्रा.श्री लक्ष्मण हाके सर युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव श्री स्वप्निल भैय्या वाघमारे, तालुका प्रमुख संतोष भैय्या राऊत शिवसेना नेते श्री अमोल उराडे यांचे मार्गदर्शनाखाली  शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख श्री विजय रुपनवर यांनी ठिकठिकाणच्या जि.प.शाळांमध्ये अनेक उपक्रम राबवून स्व. बाळासाहेबांना अभिवादन केले. सकाळी 10:30 वाजता ग्रामपंचायत कारुंडे येथे सरपंच, उपसरपंच ग्रा.पं.चे सर्व सदस्य, ग्रामसेवक तलाठी सह बहुसंख्य गावकरी बंधूंच्या उपस्थितीत नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करुन गावच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

तसेच सकाळी 11:00 वाजता जि.प.प्रा.शाळा कारुंडे येथे प्रतिमा पूजन करुन शालेय विद्यार्थ्यांना खाऊवाटप केले यावेळी कारुंडे गावचे उपसरपंच श्री सुर्यकांत पाटील आणि उपतालुकाप्रमुख विजय रुपनवर यांनी हिंदूहृदयसम्राट स्व.बळासाहेब ठाकरे यांच्या जिवनपटावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यानंतर दुपारी 12:00 वाजता शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबिर आयोजित करुन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. दुपारी 2:00 वाजता जि.प.शाळा रानगटवस्ती येथे खाऊवाटप करुन दुपारी 2:30 कोथळे येथील मानेवाडी जि.प.शाळेत खाऊवाटप करुन कार्यक्रमाची सांगता केली.


सदर कार्यक्रमाला कारुंडे गावचे सरपंच श्री कैलास नामदास, उपसरपंच श्री सुर्यकांत पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष आणि शिवसेना उपतालुकाप्रमुख विजय रुपनवर,ग्रा.पं.सदस्य, सचिन शिंदे,चि.महेश थिटे,गणेश गायकवाड, लक्ष्मण कर्चे शिवसेना नातेपुते शहरप्रमुख सनी गवळी, नातेपुते शहर संघटक निशांत इंगोले, शिंदेवाडी शाखाप्रमुख विठ्ठल शिंदे, धर्मपूरीचे मनोज राऊत, कारुंडे गावचे निष्ठावंत आणि कट्टर शिवसैनिक रामचंद्र रानगट , धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे ड्रायव्हर म्हणून काम केलेले कट्टर शिवसैनिक श्री सुभाष हुलगे,  आरोग्य विभागाचे श्री वर्पेसाहेब आणि त्यांचे सहकारी, ग्रामसेविका अत्तार मॅडम, गावचे तलाठी लोखंडे भाऊसाहेब,शाळेचे मुख्याध्यापक श्री नागनाथ शिंदे सर आणि सर्व शिक्षकवृंद, सर्व विद्यार्थी आणि बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम