#Yavat:यवत येथील पुणे सोलापूर रस्त्यावरील मोरीतील पथदिवे बंद
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
पुणे सोलापूर या महामार्गावरील यवत येथील शाळेसमोर गावात जाण्यासाठी येण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाने एक मोरी तयार केलेली आहे. चुकीच्या ठिकाणी केलेली असताना लोकांना त्याचा सारखाच त्रास होतो यावर मुख्य चौकातील मोरी पाहिजे असताना त्यांनी यवत शाळा पेट्रोल मशीन जवळ केलेली आहे. लोकांना जायला येण्यासाठी एकच असून प्रचंड वाहतुकीची शुक्रवारी गर्दी होत असते कारण शाळेत विद्यार्थी व पलीकडं यांना जाण्यासाठी याचाच वापर करावा लागतो. पश्चिमेला सोसायटी आहे मलबारे , दोरगे वस्ती आहे या मोरीतून रात्री दिवस लोकांची सतत येजा चालू असते या मोरीत लाईट असून ती मात्र रात्री बंद अवस्थेत असते हे बऱ्याच दिवसापासून लाईट नाहीये आणि संध्याकाळी लोकांना याचा त्रास होत असतो कारण काही नशा करणारे तिथे असतात जाणार येणार्या लोकांना महिलांना त्याचा त्रास होत असतो परंतु राष्ट्रीय महामार्ग चे पाटस ते अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात का असे नागरिकातून मत व्यक्त करतात समोरच पीएमटी चा स्टॉप आहे परंतु सकाळी सकाळी लोक येत असतात चुकून तेथे लाईट नसते तर अनुचित प्रकार होऊ नये असे नागरिकांचे म्हणणे आहे. या पी म पी ल चा बस स्टॉप समोरच असल्याने मोरीत लाईट चालू करावी अशी नागरिकांची मागणी आहे .
याबाबत पाटस टोल कार्यालयाशी संपर्क साधला असता एक-दोन दिवसात बंद असलेले लाईट चालू करू असे त्यांनी सांगितलेले आहे.
Comments
Post a Comment