महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
गेल्या 20 वर्षापासून रखडलेल्या कुडप धरणाया बुडीत क्षेत्रात हद्द बदलण्याचा प्रश्न अखेर आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याने अखेर मार्गी लागला आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार बुडीत क्षेत्रातील हद्द पुंभारवाडीच्या वरच्या बाजूस स्थलांतरीत करणेबाबत निर्णय झाल्यानंतर जलसंपदा कार्यकारी सांलक अतुल कपाले यांनी आमदार निकम यीं भेट घेऊन बदललेल्या हद्दीाााr पाहणी केली. यामुळे तब्बल ४० कोटी खर्च धरण उभारणा प्रश्न निकालात निघाला असून लवकरात लवकर कामालाही सुरूवात होणार आहे.
कुडप येथे धरण बांधण्याची मागणी ही पूर्वीपासूनच आहे. २००४ मध्ये या धरणाला प्रशासकीय प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र धरणाया बुडीत क्षेत्रात गावी जास्तीत जास्त भातशेती बाधित होत असल्याने त्या हद्द ही पुंभारवाडी जवळ बदलून मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी करत होते. त्यानंतर झालेल्या विरोधामुळे धरण काम रखडले होते. पुढे आमदार शेखर निकम यांनी या धरण प्रश्नात लक्ष घातले. त्यानी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे धरणी हद्द स्थलांतरीत करण्याचा निर्णय झाला. आता ग्रामस्थांच्या मागणीनुसार धरण बुडीत क्षेत्रात हद्द पुंभारवाडीच्या वरच्या बाजूस नेण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षा प्रश्न निकालात निघाल्यानंतर शनिवारी जलसंपदाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता मिलींद नाईक, अधिक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता विवेक सोनार, कार्यकारी अभियंता गणेश सलगर, उप विभागिय अभियंता विपुल खोत आदीनी सावर्डे येथे आमदार निकम यांची भेट घेऊन या धरण बांधकामासंदर्भात सकारात्मक केली. त्यानंतर स्थलांतरीत करण्यात आलेल्या हद्दीत या वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी केली.
0 Comments